दोन दागिने चोरट्यांना अटक करण्यात माळमारुती पोलिसांना यश आले आहे मारुतीचे पोलीस निरीक्षक बी आर गडेकर यांच्या नेतृत्वात पोलिसांनी कारवाई केली आहे.
पोलिसांनी रुक्मिणी नगर येथील मंजुनाथ कल्लाप्पा हलगती वय 21 व्यवसाय रद्दी पेपर विक्री रा.रुक्मिणीनगर, प्रशांत राठोड वय 22 व्यवसाय:गवंडी काम मूळ रामदुर्ग सध्या रा.रुक्मिणी नगर यांना अटक केली आहे.
पोलिसांनी त्यांच्या जवळील एक लाख 58 हजार किंमतीचे सोन्या चांदीचे दागिने जप्त केले आहेत याशिवाय आरोपीकडून बजाज डिस्कवर दुचाकी देखील पोलिसांनी जप्त केली आहे.या प्रकरणी माळ मारुती पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे.