सिद्धगंगा मठाधिश श्री शिवकुमार स्वामीजी यांचे आज निधन झाल्याचे घोषित करण्यात आले आहे. स्वतः मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांनी याबद्दल दुखवटा घोषित करून उद्या राज्यातील सर्व शाळा व महाविद्यालये बंद राहतील अशी घोषणा केली आहे.
तुमकुर येथील १११ वर्षांचे एक ज्येष्ठ मठाधिश व धर्मगुरू म्हणून स्वामींची ओळख होती. लिंगायत समाज आणि सर्व कर्नाटकात ते आदराचे स्थानी होते.
गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज त्यांची प्राणज्योत मावळली असल्याने उद्या सर्वत्र सुट्टी असणार आहे.मंगळवारी शाळा कॉलेज सोबत सर्व शासकीय कार्यालये देखील बंद असणार आहेत.