गोगटे सर्कल येथे रेल्वे ओव्हरब्रिज बांधून झाल्यावर दुभाजकाच्या मधोमध शोभेची झाडे लावण्यात आली. पण त्यांना पाणी घालण्यात येत नव्हते. यामुळे ही झाडे सुकून जात होती. या झाडांची काळजी घेण्याचे काम आज कृष्ण चैतन्य फौंडेशन तर्फे हाती घेण्यात आले.
खास टँकर ने पाणी आणून या ब्रिजवरील सुकणाऱ्या झाडांना पाणी घालण्यात आले.
यावेळी गंगानंद भांदुर्गे, दीपक नार्वेकर, स्वप्नील भडाळे, केदार मोहिते, गोपाळ यादव, महेश पाटील, प्रमोद कुंडेकर, सुरक्षारक्षक प्रमोद आणि महेश खानोलकर हे उपस्थित होते.
दोन महिन्यांपूर्वीच २१ तारखेला एक वाईट घटना घडली होती त्यानंतर जागृती फलक आणि समाजाला उपयुक्त कामे करून हे फौंडेशन एक वेगळी छाप पाडत आहे. यावेळी सुकणाऱ्या त्या झाडांना पाणी देऊन चांगले काम करण्यात आले आहे.