स्वातंत्र्य आणि प्रजासत्ताक दिन असला की फक्त शाळेत शिकणाऱ्यानी शाळेत जायचे आणि ध्वजवंदन करून राष्ट्रगीत गायचे आणि बाकीच्यांनी पिकनिक करायची अशी प्रथाच पडली आहे.
शाळा शिकून झाल्यावर काही ठराविक व्यक्ती, राजकारणी आणि अधिकारी वगळता कुणी ध्वजवंदन करायला जात नाही. पण महाद्वार रोड येथील शाळा क्रमांक १२ च्या विद्यार्थ्यांनी आज आदर्श निर्माण केला आहे. जुने मित्र एकत्र आले आणि त्यांनी विधायक कार्य केले आहे. आणि प्रजासत्ताक दिन सुद्धा जोरात साजरा केला आहे.
यावेळी शाळेत शिकणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्य वाटण्यात आले. मिठाईचे बॉक्स, ब्लॅंकेट आणि स्कुल बॅग ही देण्यात आल्या.
एवढेच करून हे थांबले नाहीत तर त्यांनी माजी शिक्षकांचाही पुष्पगुच्छ आणि मिठाई देऊन सत्कार केला आहे. डोंगरे, जोशी, गोडबोले, राणे, बुधानांवर, कुरंगे हे माजी शिक्षकही भारावून गेले होते.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी उपमहापौर रेणू मुतकेकर, नगरसेविका वैशाली हुलजी, दौलत साळुंके, राजू भातकांडे, सुनील पाटील व इतर उपस्थित होते.