बेळगाव ते गोवा (अनमोड ) मार्गाचे काम सुरू आहे त्यामुळे सर्व प्रकारची वाहतूक बेळगाव चोरला मार्गावरून जात असून, अवजड वाहतूक जात असल्यामुळे अनेक धोके निर्माण होत आहेत. त्यामुळे कृपा करून बेळगाव चोरला मार्गावरून अवजड वाहतूक थांबवा. अशी मागणी बेळगाव सिटीजन कौन्सिलच्या वतीने वनमंत्री सतीश जारकीहोळी यांच्याकडे करण्यात आली.
हा मार्ग चोरला या घाटातून जातो आणि या रस्त्यावर प्राणी यांचे वास्तव्य असते त्यामुळे त्यांना धोका होऊ शकतो याचा विचार करून ही वाहतूक थांबा अशी मागणी अध्यक्ष सतीश तेंडुलकर, राकेश कलघटगी यांनी केली.विकासाला सिटीझन कौन्सिलचा विरोध नाही मात्र निसर्गाच्या मुळावर येऊन नको ,हेम्मडगा मार्गे वळवलेली वाहतूक भीमगड अभयारण्यातुन जाते तर जांबोटी मधून जाणारी वाहतूक म्हादाई जंगलातून जाते.कस्तुरीरंगन आणि माधव गाडगीळ हे दोन्ही अहवाल पश्चिम घाटावर महत्वाचे मानले जातात त्या प्रमाणे सगळे वन्य जीवी आणि वने सुरक्षित कशी राहिली पाहिजेत यावर सरकारने उपाय योजना केल्या पाहिजेत अशीही मागणी त्यांनी केली.
जंगलातील अति अवजड वाहतुकीमुळे जंगलातील झाडांना हादरे बसतात झरेआणि प्राण्यांना धोका निर्माण होऊन परिणाम होऊ शकतो. मुळात चोरला रस्ता अवजड वाहनांच्या साठी नाही मात्र याचा वापर अवजड वाहनांसाठी झाल्याने याचा त्रास जांबोटी कणकुंबी भागातील लोकांना झाला आहे.
बेळगावची बाजारपेठ गोव्यावर अवलंबून आहे अनमोड बंद झाल्याने बाजारपेठेवर देखील परिणाम झालेला आहे जवळपास दररोज 500 ट्रक माल बेळगावहुन गोव्याला जातो अनमोड बंद झाल्याने यावर परिणाम झाला आहे असे निवेदनात नमूद करून सिटीझन कौन्सिनने यावर उपाय देखील सुचवला आहे.
सध्या बेळगावात कार्पोरेशन ऑफ कंटेनर इन इंडिया हे कार्यालय देसुर मध्ये असून देखील बंद आहे देसुर ते वास्को ट्रेन द्वारे रो रो सर्व्हीस सुरू केल्यास यावर तोडगा निघू शकेल एका कंटेनर ट्रेन मध्ये शंभर ट्रक चे सामान देसुर हुन वास्कोला जाऊ शकते त्यामुळे ही सेवा सुरू करा असा उपाय दिला असून त्यावर नक्कीच विचार करू अशी ग्वाही वन आणि पर्यावरण मंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली असल्याची माहिती सतीश तेंडुलकर यांनी बेळगाव live कडे दिली.
वन मंत्र्या अगोदर रो रो सेवा सुरू करण्याची मागणी रेल्वे मंत्री पियुष गोयल आणि दक्षिण पश्चिम रेल्वे महा प्रबंधक ए के सिंह यांच्याकडे केली असल्याचे ते म्हणाले .
Sagala problem jar ka heavy vehicle Cha asel tar maag car ani motorcycle ne transportation karava…..
Ya varil manyavarani