उद्योजक संजय घोडावत यांच्या मालकीच्या स्टार एअर ने बेळगाव करांसाठी आनंदाची बातमी आणली असून स्टार एअर च्या वेबसाईट द्वारे शनिवार सकाळ पासून बेळगाव बंगळुरू साठी बुकिंग सुरू करण्यात आली आहे. बेळगाव शिवाय हुबळी तिरुपती आणि बंगळुरू तिरुपती साठी देखील बुकिंग सुरू करण्यात आले आहे.
स्टार एअर ने हुबळी बंगळुरू आणि तिरुपती ची विमानसेवेची अधिकृत घोषणा केली आहे मात्र या घोषणेत अद्याप बेळगाव बंगळुरूची उल्लेख केला नाही. मात्र वेबसाईटवर बेळगाव ते बंगळुरू आणि बंगळुरू बेळगावं साठी 6 फेब्रुवारी पासून तिकीट बुक करु शकता यासह वेळा पत्रक देखील जाहीर करण्यात आले आहे.
आर सी एस योजनेद्वारा बेळगाव बंगळुरूचा स्टार एअरचा 2767 रुपयांत विमान प्रवास करता येणार आहे.
असे असेल वेळा पत्रक
आठवड्यातील दिवस1,3,4,5,6,7(मंगळवार वगळता)
बेळगाव (IXG) ते बंगळुरू (BLR)
OG-106 15:00 Nonstop 16:05
बंगळुरू (BLR) ते बेळगाव (IXG)
OG-105 13:25 Nonstop 14:30
दिवस 2 मंगळवारचे वेळा पत्रक
बंगळुरू (BLR) ते बेळगाव (IXG)
OG-106 16.30 Nonstop 17.35
बेळगाव (IXG) ते बंगळुरू (BLR)
OG-105 18.00 Nonstop 19.05