बेळगाव शहराची होलसेल बाजार पेठ म्हणून ख्यात असलेल्या पांगुळ गल्ली येथे मास्टर प्लॅन मोहीम राबवून दोन महिने उलटले तरी अद्याप कोणत्याही कामाला सुरुवात झालेली नाही यामुळे नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
या होलसेल मार्केट असलेल्या गल्ली सध्या विद्रुपीकरण अवस्थेत आहे महापालिकेच्या वतीने दोन महिन्यांपूर्वी रस्ते रुंदीकरण करण्यासाठी 30 फूट रूंद मास्टर प्लॅन मोहीम राबवण्यात आली होती त्यानुसार नोव्हेंबर महिन्यात व्यापाऱ्यांनी आपापल्या इमारतीतली अतिक्रमण बाजूला करून घेतली होती तेंव्हा पासून ठिकठिकाणी गल्लीत मातीचे ढिगारे आणि धुळीचे साम्राज्य पहावयास मिळत आहेत.
पांगुळ गल्ली कोणत्याही ठिकाणी दुचाकी किंवा चार चाकी पार्किंग ला जागाच नाही धुळीचे साम्राज्य आणि मातीच्या ढिगा व्यतिरिक्त या गल्लीत काहीच दिसत नाही या सर्व गोष्टींमुळे व्यापाऱ्यांवर व्यवसायावर देखील परिणाम झालेला आहे.गल्लीतीले पूर्वीचे इलेक्ट्रिक खांब देखील काढण्यात आलेले नाहीत.
गेल्या दोन महिन्यांपूर्वी राबवण्यात आलेली मास्टर प्लॅन मोहीम थंड आलेली असून कोणतेच काम याठिकाणी करण्यात आले नाही त्यामुळे गल्लीतील व्यापारी देखील चिंतेत आहेत बेळगाव शहर स्मार्ट करण्याच्या घोषणा केल्या जात आहेत ते काम देखील अतिशय धिम्या गतीनं सुरू असताना पांगुळ गल्लीची देखील वेगळी परिस्थिती नाही.मास्टर प्लॅन मोहीम राबवण्यासाठी पुढाकार घेतलेल्या लोकप्रतिनिधींनी कामांसाठी देखील पुढाकार घ्यावा अशी मागणी होत आहे.
काहीही करून पावसाळ्या आधी काम पूर्ण करा अन्यथा चिखलाचे साम्राज्य होईल अशी भीती देखील व्यक्त केली जात आहे या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यास पांगुळ गल्ली कधी स्मार्ट होणार हाच प्रश्न येथील व्यापाऱ्यांना पडलाय.स्थानिक लोकप्रतिनिधी आणि पालिकेचे अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष घालून काम जलद गतीने करावे अशी मागणी केली जात आहे.