Thursday, May 2, 2024

/

‘शरद पवारांनी पापू च्या कार्यक्रमास जाऊ नये’

 belgaum

कर्नाटक एकीकरण समितीचे नेते,जेष्ठ कन्नड पत्रकार आणि महाराष्ट्राबद्दल नेहमीच आगपाखड करणारे, पाटील पुट्टप्पा यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात राष्ट्रवादीचे प्रमुख आणि सीमावासीयांचे नेते शरद पवार यांनी अजिबात उपस्थित राहू नये. अशी चर्चा सीमाभागात सुरू आहे यासंदर्भात सोशल मीडियावर चर्चेला सुरुवात झाली असून पवारांनी कोणत्याही परिस्थितीत कार्यक्रमाला जाऊ नये कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

शरद पवार हे राष्ट्रीय नेते असले तरी पाटील पुट्टप्पा यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या विरोधात केलेली वक्तव्ये विधाने आणि एकूणच लढ्यात त्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे पाटील पुट्टप्पा वादग्रस्त आहेत .आणि बेळगाव सह संपूर्ण भाग हा कर्नाटकाचाच असल्याचे त्यांनी वारंवार आपल्या विधानातून दाखवून दिलेले आहे .अशा व्यक्तीच्या कार्यक्रमांमध्ये शरद पवारांनी उपस्थित राहणे कितपत योग्य आहे? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

म ए समितीचे पाईक यासारख्या वेग वेगळ्या ग्रुपच्या माध्यमातून शरद पवारांच्या कृतीवर नाराजी व्यक्त होत आहे. शरद पवार  शनिवारी कडोली येथे शिव पुतळा उदघाटनासाठी उपस्थित राहणार आहेत की पाटील पुट्टप्पा यांच्या कार्यक्रमासाठी ते येत आहेत असा प्रश्न निर्माण झालाय. पापु चा कार्यक्रम सोमवारी आहे त्यामुळे शरद पवारांनी  या कार्यक्रमाला जाण्याचे टाळावे अशी मागणी होत आहे. या मागणीवर शरद पवार कोणती कृती करतात ते पाटील यांच्या कार्यक्रमाला जातात की नाही यासंदर्भात उलटसुलट चर्चा सुरू असून आता शरद पवारांच्या कृतीवरच कळणार आहे.

 belgaum

1986 च्या कन्नड सक्ती आंदोलनापासून आणि त्या पूर्वीपासूनच शरद पवारांचा सीमाभागातील सहभाग मोठा असला तरी बर्‍याचदा राष्ट्रीय धोरणात्मक निर्णयामुळे त्यांनी सीमा प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांच्यावर होत होता. मात्र सध्या सीमाप्रश्नाच्या महाराष्ट्राने दाखल केलेल्या सुप्रीम कोर्टातील खटल्यात खरे आधारस्तंभ म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांना योग्य मार्गदर्शन करून सीमाप्रश्नाचा खटला योग्यरीत्या पुढे चालवण्याचे काम शरद पवार करत आहेत. तेंव्हा वादग्रस्त व्यक्तीच्या कार्यक्रमाला जाऊन त्यांनी त्यांच्या भावना दुखावू नये अशी मागणी जोर धरत आहे

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.