रोटरी क्लब ऑफ वेणूग्रामच्या वतीने उद्या बेळगाव शहरातील सिंघम पोलीस अधिकारी आणि पत्रकारांना सेवाभावी पुरस्कार देण्यात येणार आहे.
शहापूर पोलीस स्थानकाचे सिपीआय जावेद मुशाफिरी, तरुण भारतचे पत्रकार प्रसाद प्रभू आणि कन्नड दैनिकाचे पत्रकार
विवेक महाले यांना हा पुरस्कार दिला जाणार आहे.
कॅम्प येथील मेसोनिक हॉल येथे गुरुवारी सायंकाळी 8 वाजता आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार दिला जाणार आहे.
रोटरी क्लब ऑफ वेणूग्राम दरवर्षी विविध क्षेत्रात चांगले काम करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन प्रोत्साहन देते. या कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित राहून पुरस्कार प्राप्त व्यक्तींना प्रोत्साहन द्यावे असं आवाहन करण्यात आले आहे.
शहापूर पोलीस निरीक्षक जावेद यांनी गेल्या वर्ष भरात शहापूर पोलीस स्थानक कार्यक्षेत्रात शांतता प्रस्थापित करत अनेक सेवाभावी कार्ये केली आहेत त्यामुळे रोटरी सारख्या संस्थेने घेतली आहे या शिवाय दोन्ही पत्रकारांचे देखील योगदान आहे.