गोगटे सर्कल येथील रेल्वे ओव्हरब्रिज बांधून अजून एक महिनाही पूर्ण झाला मात्र त्यावरील रस्ता खचला आहे. या प्रकाराने नागरिकांना या ब्रिजचे काम किती सुरक्षित झाले आहे असा प्रश्न पडला असून एकूण कामाच्या दर्जाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
त्यावरून वाहतूक करण्यासाठी बांधण्यात आलेला रस्ता अतिशय घाईगडबडीने झाला. तो पूर्ण करताना योग्य ती काळजी घेण्यात आलेली नाही. यामुळे आता रस्ता खचला.आता खचलेल्या रस्त्यावर डांबर आणि खडी घालून डागडुजी करण्याचे काम सुरू आहे .यामुळे महिन्याभरातच याची चर्चा असून रेल्वे इंजिनिअरिंग विभागाने केलेल्या कामाची अवस्था समोर आली आहे.
कमी वेळेत आणि मदतीपेक्षा आधी हा ब्रिज केला आणि तो लवकर सुरू करण्यासाठी राजकीय गडबड झाली. मात्र काम योग्य वेळेत आणि दर्जेदार होण्याकडे कोणी लक्ष दिले नाही म्हणूनच आता ब्रिजवरील रस्ता खचला .अशी चर्चा सुरू आहे.
करोडो रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या ब्रिज वर पंधरा दिवसातच खचलेला रस्ता आज खडी डांबर घालून मुजवण्यात आला आहे ही अतिशय कमी पद्धतीच्या कामाची पद्धत असून याचे काम केलेल्या कंत्राटदारांवर कारवाई करण्याची गरज आहे.