कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवर मागे बसलेली महिला ठार झाल्याची घटना मंगळवारी घडली आहे.पुणे बंगळुरू हायवेवर बेळगाव यमनापूर जवळ हा अपघात झाला आहे.
बेळगाव कडून कोल्हापूर कडे जाणाऱ्या मारुती स्विफ्ट कारने दुचाकीला पाठीमागुन दिलेल्या धडकेत महिला ठार झाली आहे.पतीपत्नी आपल्या दोन वर्षीय मुली सह दुचाकी वरूनबेळगाव हुन रायबाग कडे जात होते त्यात पत्नी ठार झाली असून तिचं नाव रेणुका कुणाल कांबळे वय 21 आहे. त्या के एल ई इस्पितळात नर्स चे काम करत होती.
सदर स्विफ्ट कारने आणखी एका दुचाकीला धडक मारली असून त्या दुचाकी वरील दोघे किरकोळ जखमी झाले आहेत.अपघात होताच स्विफ्ट कार चालक फरारी झाले होते.रहदारी उत्तर पोलीसात घटनेची नोंद झाली आहे.