Thursday, January 2, 2025

/

भारत बंद-आर सी यु व्ही टी यु परीक्षा पुढे..

 belgaum

8 आणि 9 जानेवारी रोजी होणाऱ्या भारत बंद मुळे व्ही टी यु आर सी यु च्या परीक्षा पुढे ढकलल्या असून या दोन दिवशी बँका देखील बंद असणार आहेत.

इतकंच नव्हे तर कर्नाटक राज्य परिवाहन मंडळाच्या बस बंद

बंगळुरु तील सर्व खाजगी शाळा कॉलेज सुट्टी जाहीर करण्यात आली असून अद्याप बेळगाव जिल्हा प्रशासनाने सरकारी शाळा कॉलेजना अधिकृत सुट्टी जाहीर केलेली नाही.बेळगाव वकील संघटना बार असोसिएशनने देखील बंद पाठिंबा जाहीर केला आहे.

ऑल इंडिया एम्प्लॉई असोसिएशन आणि बँक एम्प्लॉई फेडरेशन ऑफ इंडिया यांनी देशातील सर्व बँकांना दोन दिवसीय बंद आंदोलन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

दोन दिवसांच्या या बंदला अनेक INTUC, AITUC, HMS, CITU, AIUTUC, AICCTU, UTUC, TUCC, LPF SEWA या दहा युनियन पाठिंबादेत राष्ट्रीय स्तरावर आंदोलन समर्थन केले आहे.

ऑटो रिक्षा देखील बंद असणार आहेत सोमवारी ते मंगळवारी सहा पर्यंत शहरातील ऑटो बंद असतील.ट्रेड युनियन नी पुकारलेल्या बंदच्या मागण्यात इन्शुरन्स,आर टी ओ चार्जेस आदी ऑटो चालकांच्या मागण्या देखील सामील आहेत त्यामुळं रिक्षा देखील बंद असणार आहेत.

या दोन दिवसीय बंद मुळे रेल्वे बँक,इलेक्ट्रिक सिटी विभाग कर्मचारी,यासह अनेक तळागळातील प्रभावित असणार आहे.ऑटो रिक्षा ,ट्रक आदी पुढील 48 तास बंद असणार आहेत.कर्नाटक राज्य परिवाहन मंडळाने या बंदला पाठिंबा दिल्यामुळे दोन दिवस बस देखील बंद असणार आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.