टिळकवाडी पहिल्या रेल्वे गेट जवळ बसवण्यात आलेले बॅरिकेड्स हटवा अशी मागणी करून सुद्धा पोलीस दुर्लक्ष करत आहेत. या विरोधात आंदोलन करण्यासाठी नागरिकांना अर्थात प्रजेला प्रजासत्ताक दिनी रस्त्यावर उतरावे लागले आहे. जनतेने पहिल्या रेल्वेगेट जवळ रास्तारोको करून आपली चीड व्यक्त केली आहे.
रहदारीची अडचण येत असल्याचे कारण सांगून या ठिकाणी बॅरिकेड्स लावून लोकांची ये जा थांबविण्यात आली आणि नागरिकांनी कायम अडचणी सांगूनही दुर्लक्ष करण्यात आले. यानंतर माजी पोलीस आयुक्त डी सी राजाप्पा यांनी गोगटे रेल्वे ओव्हरब्रिज पूर्ण झाल्यावर हे बॅरिकेड्स हटवून टाकू असे पहिल्यांदा आश्वासन दिले होते पण ब्रिज पूर्ण झाल्यावर हे बॅरिकेड्स हटणार नाही असे सांगून हात झटकले आहेत.
या प्रकाराने परिसरातील जनता चिडली आहे. वाहने वळसा घालून फिरून जाऊ शकतात पण पायी जाणाऱ्या नागरिकांचे काय असा प्रश्न विचारून आज 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनी हे आंदोलन होत असून प्रशासन आज जागे होईपर्यंत आम्ही माघार घेणार नाही असे ठणकावून सांगत आहेत.