बेळगावकर कुठेही जावोत आपलं सामाजिक काम करतच असतात. बेळगावच्या वन टच फौंडेशनचे विठ्ठल पाटील यांनी पुणे येथे गेले असता समाज कार्य केले आहे. आपल्या मानवतेचे पुण्यातही दर्शन घडवले आहे.
पुणे स्टेशन जवळ एक व्यक्ती नग्नअवस्थेत होती. शरीर झाकुन घेण्यासाठी लोकांच्याकडे रडत विनवणी करत होती. ऐन थंडीत त्याच्या कडे कोणीही लक्ष देत नव्हते.त्यावेळी पाटील यांनी त्याला कपडेच खरेदी करून दिले.
पाटील यांनी live शी बोलताना सांगितले की ‘त्याला दुकान मधे घेऊन गेलो, तेवढयात एक अनोळखी पुणेकर आला मला भेटला त्याला सुधा त्याची दया आली माणुसकीच्या नात्यांनं आम्ही दोघानी मिळून नविन कपडे खरेदी करुन दिले.तेव्हां त्या व्यक्तीचा चेहरा आनंदाने फुलला होता’.बेेळगाव Live ने देखील थंडीत सोसणाऱ्या गरजूंना माणुसकीची झालर द्या असें आवाहन केले होते त्याला प्रतिसाद देत अनेक सामाजिक संघटना हे कार्य करत आहेत बेळगावातील व्यक्तींनी पर गावी जाऊन समाज कार्य करणे कौतुकास्पद आहे.
बेळगावा मध्ये सामाजिक कामाची परंपरा आहे .अनेक जण विधायक उपक्रम राबवून गोरगरिबांना मदत करीत असतात. आपल्या शहरातच काम करून मर्यादित राहण्याची भावना बेळगावकरांमध्ये नाही. यामुळेच जेथे जाऊ तेथे मानवतेचा दृष्टिकोन बाळगण्याची ही पद्धत आदर्श ठरते.