Monday, December 23, 2024

/

विवाहितेने केली आत्महत्या

 belgaum

ओम नगर खासबाग येथील एका विवाहितेने लग्न होऊन झालेल्या दोन वर्षातच आत्महत्या केली आहे. याप्रकरणी तिच्या वडिलांनी शहापूर पोलीस स्थानकात सासरच्या मंडळींवर तक्रार दिली आहे .
मुलगी झाली म्हणून आपल्या मुलीचा छळ केल्यामुळे तिने आत्महत्या केली आहे. असा आरोप करण्यात आला आहे. सोमवारी रात्री दहाच्या सुमारास आत्महत्या झाली असून अक्षता विद्याधर काकतीकर (26) असे आत्महत्या करणाऱ्या या महिलेचे नाव आहे .तिच्या वडिलांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून पती विद्याधर कुंदन कातेकर ( 28) सासरा कुंदन विश्वनाथ काकतीकर (वय 50 )सासु कांचन कुंदन काकतीकर (वय 46) यांच्याविरोधात छळवणूक आणि आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Suicide near khasbag
शहापूर पोलीस स्थानकात हा गुन्हा दाखल झालाय. अक्षता चे वडील विनायक शंकर सोनार रा. नंदी गट्टी तालुका हल्ल्याळ यांनी हा गुन्हा दाखल केला आहे. आपल्या मुलीचा विवाह झाल्यानंतर तिला पहिली मुलगी झाली मात्र सासरच्या लोकांना पहिल्यांदा मुलगाच पाहिजे होता यावरून तिचा छळ सुरू होता. मुलगी झाल्यापासून छळ अधिक वाढला होता.

याबद्दल तिने आपल्या आई-वडिलांकडे कायम तक्रार केली होती मात्र त्यांनी तितके लक्ष दिले नव्हते. सोमवारी सायंकाळी पुन्हा त्रास देण्यात आल्यानंतर ती आपल्या बेडरूम मध्ये जाऊन गळफास घेतले आहे. पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी पुढील तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.