गोगटे सर्कल च्या ब्रिजच्या चौकशीची मागणी करून या सर्कल मधील बांधकामाची चौकशी व्हावी आणि दर्जाहीन कामाची लवकर चौकशी करून कारवाई करावी. अशी मागणी बेळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन केली आहे .
बेळगाव शहराचा उत्तर आणि दक्षिण भाग जोडणारा ब्रिज वाहतुकीच्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे. यावरून महिला मुले विद्यार्थी प्रवास करतात याब्रिजच्या भिंतींना तडे गेल्याच्या बातम्या सगळीकडे आल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. यावरून जावे की नाही अशी शक्यता आणि भीती नागरिक व्यक्त करत असून नागरिकांच्या मनातील ही भीती दूर करण्यासाठी योग्य चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आले आहे .
केंद्रीय रेल्वे मंत्री मुख्यमंत्री आणि वन मंत्री सतीश जारकीहोळी यांना देखील निवेदनाची प्रत देऊन मागणी करण्यात आली आहे.सरकारने मंजूर केलेला निधी योग्य रीतीने वापरून ब्रिज निर्माण करण्याची गरज होती मात्र दुरुपयोग करून कमी दर्जाचे आणि चुकीच्या पद्धतीने बांधण्यात आला आहे. केवळ एका महिन्यात रस्ता खचतो भिंतीला तडे जातात हे दुर्दैव आहे याची चौकशी व्हावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.
यावेळी राष्ट्रवादीचे महानगर अध्यक्ष सुरेंद्र अनगोळकर,महिला मोर्चा प्रमुख कविता पतंगे,जनरल सेक्रेटरीअमोल देसाई,अल्पसंख्याक प्रमुख खताल गच्चीवाले, जिल्हा अध्यक्ष सदानंद पाटील,दुर्गेश मैत्री सीमा इनामदार,शाम मंथरो आदी उपस्थित होते.