रिंग रोड साठी अधिसूचना जाहीर करून जिल्हा प्रशासनाने जवळ पास 30 गावातील 675 हेक्टर सुपीक जमीन संपादित करण्याचे जाहीर केल्या नंतर तालुक्यातील शेतकऱ्यांत खळबळ माजली असून अनेकांनी यांच्या नोटिफिकेशन सोबत कोणकोणती जमीन संपादित केली जाणार आहे.
गेल्या चार दिवसांपूर्वी ही अधिसूचना बेळगाव प्रांत अधिकाऱ्यांनी जाहीर करताच या संदर्भात अधिक तपशील मिळवण्यासाठी शेतकरी वर्गाची शेतकरी नेत्यांची धडपड सुरू झाली आहे.
सोमवारी तालुका पंचायत सदस्य सुनील अष्टेकर यांच्या नेतृत्वात किरण पाटील(येळळूर) बाळकृष्ण तेरसे, संतोष पाटील(उचगावं)यानी प्रांत अधिकारी कविता योगप्पन्नावर यांची भेट घेऊन या भु संपदानाचा विरोध करत तपशील मागितला आहे.
मुतगा गावासह बेळगाव तालुक्यात किती कोणत्या जमीनीत संपादन केले जाणार सर्व्हे नंबर प्रमाणे माहिती रिंग रोड चा नकाशा याची माहिती मागितली आहे.