बेळगाव ते गोवा महामार्गाचे काम सुरू आहे. या महामार्गावरील बेळगाव ते खानापूर या टप्प्यासाठी बारा गावातील जमीन लागणार असून या बारा गावात भूसंपादन होणार आहे. ३० किलोमीटरच्या टप्प्यात एकूण १५५.९८६ हेक्टर जमीन लागणार आहे त्यापैकी २६.७५ हेक्टर जमीन मिळाली असून अजून १२९.२३६ हेक्टर जमिनीचे संपादन करावे लागणार आहे .
देसुर, झाडशहापूर ,हलगा, मच्छे गणेबैल, अंकले हतरगुंजी, निट्टूर हलकर्णी, करांबळ, खानापूर बेळगाव, माधवपुर वडगाव, शहापूर ,अनगोळ आणि मजगाव या गावातील भूसंपादन करावे लागणार आहे
या महामार्गासाठी लागणारी बेळगाव विभागात येणारी जमीन संपादित करून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला दिली जाईल सर्व शेतकरी आणि जागामालकांना भूसंपादनाच्या नवीन कायद्यानुसार भरपाई दिली जाईल अशी माहिती प्रांताधिकारी डॉक्टर कविता योगपनावर यांनी दिली आहे.
काही लोक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या महामार्ग योजना बदलल्या असून रुंदीकरण होणार नाही असा समज पसरवत आहेत मात्र तसे काही नसून भरपाई देऊन जागा घेतली जाणार असून ठरल्याप्रमाणे महामार्ग होणारच आहे असेही प्रांताधिकाऱ्यांनी प्रेस नोट च्या माध्यमातून कळवले आहे.