कडोली ग्राम पंचायत चे अध्यक्ष राजू मायना यांनी नुकतीच राजीनामा दिला आहे. या राजीनाम्याचे निश्चित कारण समजू शकले नाही. पण त्यांनी हा राजीनामा जिल्ह्या पंचायतीचे उपाध्यक्ष अरुण कटांबळे यांच्याकडे दिला आहे.
गुरुवारी जिल्हा पंचायत कार्यालयात हा राजीनामा देण्यात आला आहे. या राजीनाम्यामुळे मात्र उलटसुलट चर्चा करण्यात येत आहे सध्या मायना यांनी राजीनामा दिला असला तरी पुढील अध्यक्ष कोण होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
हा राजीनामा अजूनही अधिकृत नसला तरी राजकीय हेवेदाव्यातुन हा राजीनामा देण्यात आला नाही ना अशी चर्चाही गावात सुरू होती. दरम्यान यापुढे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष होणार की महाराष्ट्र एकीकरण समितीचा याकडे लक्ष लागले असून यावर कोणती ही खेळी खेळण्यात येणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.
शुक्रवारी अधिकृतरित्या प्रांताधिकारी यांच्याकडे हा राजीनामा सोपविण्यात येणार आहे. याबाबत माध्यमांनी राजू मायना यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपला अडीच वर्षे कार्यकाळ पूर्ण झाला असून त्यामुळे आपण राजीनामा देत असल्याचे सांगितले. शरद पवार यांच्या नुकत्याच झालेल्या दौऱ्याने हे गाव आणि ग्राम पंचायत अध्यक्ष चर्चेत होते.