Tuesday, April 23, 2024

/

मुख्यमंत्र्यांचा दौरा रद्द- पवार सिद्धरामय्या कडोलीत

 belgaum

कडोली येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ मूर्तीच्या लोकार्पण कार्यक्रमात मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांचा दौरा रद्द झाला असून माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.

मुंबईहून विशेष विमानाने शरद पवार हे सांबरा विमान तळावर सकाळी साडे अकरा वाजता पोचणार आहेत तर सिद्धरामय्या दुपारी साडे बारा वाजता हुबळी विमान तळावर पोचणार आहेत.सिद्धरामय्या हे कडोलीत अंदाजे दीड वाजता तर पवार साडे बारा पर्यंत पोचतील अशी शक्यता आहे.

बेळगाव महाराष्ट्र एकीकरण समिती,राष्ट्रवादी काँग्रेस आणि स्थानिक काँग्रेस कार्यकर्ते सांबरा विमान तळावर स्वागतासाठी जाणार आहेत.साताऱ्याचे खासदार उदयनराजे हे कडोली सोबत जिजाऊ जयंती निमित्त सिंदखेड प्रमुख पाहुणे आहेत ते दोन्ही पैकी एका कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात.यामुळे शरद पवार हेच या कार्यक्रमाचे आकर्षण असणार आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.