Saturday, January 11, 2025

/

वार्षिक राशी भविष्य आजची रास “कुंभ”(aquarius)

 belgaum

आजची राशी कुंभ  -॥ उत्कर्ष उन्नती साधाल॥

कुंभ राशी काळपुरुषाच्या कुंडलीतील अकरावी रास असून पश्‍चिमी दिशेला तिचे वर्चस्व असते. या राशीचे लोक कुशाग्र बुध्दीमत्तेचे विचारशील, उदार, थोड्या गंभीर, सहनशील वृत्ती असणार्‍या धार्मिक व धैर्यवान अशा असतात. याचे मुख्य वैशिष्ट्ये म्हणजे यांना आपल्या बौध्दीक क्षमतेवर खूप विश्‍वास असतो. तसेच गुढविद्या गुप्तविद्या रहस्तमय गोष्टी शोधण्याची त्यांना विशेष आवड असते. या राशीचे लोक आपला विचार दुसर्‍यांवर लावण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे समाजात त्याच्याबद्दल गैरसमज निर्माण होतो. याच्याकडे चांगल्या प्रकारची ग्रहण शक्ती असते. व्यवहाराला पारदर्शक असतात.

या राशीचे लोक विशेष करुन आंतरराष्ट्रीय व्यापार किंवा कंपन्या यामध्ये काम करणारे तसेच संशोधन क्षेत्रे ज्यात विज्ञान अंतराळातील शोध तसेच, हवामान खाते, प्लॅस्टीकच्या वस्तुचा व्यापार त्यासंबंधीचे व्यवसाय यात विशेष दिसून येतात.

या लोकांना विशेष करुन वातविकार सर्दीचे विकार म्हणजे नाक,कान, घसा या संदर्भाचे आजार विशेष असतात. मानसिक अस्वच्छता, पायासंबंधीचे विकार होवू शकतात.
वार्षिक ग्रहमान

जाने फेब्रु गुरु आपल्या दशम स्थानात असल्याने नोकरी व्यापार या दृष्टीने लाभदायी राहील. तसेच रवी बुध केतू व्ययस्थानात असल्याने कर्जबाजारीपणा येऊ शकतो. उधार-उसनवारी या काळात टाळावी .लग्नातील नेप कल्पकता देईल. नवनवीन गोष्टी शिकण्याची आवड निर्माण होईल. चतुर्थेश लाभात आईच्या प्रकृतीची काळजी निर्माण करू शकतो. द्वितीयतील मंगळ आवक पेक्षा जावक जास्त होईल. या काळात महिलांनी खर्चावर नियंत्रण ठेवावे. विनाकारण होणारे खर्च टाळावे. या काळात बोलताना जिभेवर ताबा न राहिल्याने इतरांचे मन दुखावले जाईल. तरी स्वतःवर नियंत्रण ठेवावे.

मार्च एप्रिल या काळात त्रितीयात मेषेचा मंगळ हर्षल योग पराक्रमात वाढ करेल. मैदानी खेळात असणाऱ्या विद्यार्थी वर्गाला यशदायी राहील. कला क्रीडा क्षेत्रात नैपुण्य मिळवाल. तसेच नोकरीत असणाऱ्या व्यक्तींना परदेश गमनाचे योग येथील. दशमेश पराक्रमात असल्याने स्वपराक्रमाने धन संपादन कराल. मायनिंग ट्रांसपोर्ट व्यवसाय लोकांना व्यापारात फायदा होईल .परंतु हा मंगळ हर्षल योग बहीण भावा मध्ये गैरसमज निर्माण करेल. शेजारी व्यक्तिशी विशेष जमणार नाही. षष्ठ स्थानातला राहु जनावरा पासून धोका देईल .

मे-जून आपल्या द्वितीयात मीनेचा शुक्र कलाक्षेत्र संगीत यात करिअर करणाऱ्यांना चांगला राहील. महिलांना याकाळात गृहसौख्य लाभेल. घरात आनंदाचे वातावरण राहील. नवीन वास्तूचे योग येतील .मातेचे सौख्य लाभेल. विद्यार्थी वर्गाला शिक्षण क्षेत्रात करिअर किंवा नवीन काही शिकण्यास उत्तम राहील. वर्षभर बरोबर नसले तरी 29 मार्चला लाभात गुरू येईल तारीख 22 एप्रिल पर्यंत तेथे राहील. या काळात विवाहासंबंधी बोलणी यशस्वी होतील. संतती असणाऱ्यांना संततीबद्दल एखादी चांगली बातमी कानी पडेल .

जुलै ऑगस्ट या काळात पंचमात येणारा राहू गर्भवती स्त्रियांच्या बाबतीत विशेष फलदायी नसेल. या काळात गर्भवती स्त्रियांनी विशेष काळजी घ्यावी. 16 जुलै रोजी होणारे ग्रहण आपल्या राशीला शुभ असले तरी गर्भवतीने ग्रहण पाहू नये. पंचमेश राहुमुळे मुलांच्या अभ्यासाकडे थोडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी विद्यार्थ्यांनी घ्यावी. या काळात वयस्कर मंडळींनी प्रकृतीची विशेष काळजी घ्यावी. सर्दी कफ संबंधीचे संबंधिचे छाती संबंधी त्रास जाणवतील.

Kumbh

सप्टेंबर ऑक्टोबर सप्टेंबर महिन्यात सप्तमातल्या रवि-मंगळ उच्चीचे सरकारी कामात यश देईल किंवा सरकारी क्षेत्रात काम करणार्‍यांना भरती बढतीचे योग देईल. आपल्या वैवाहिक जोडीदाराबद्दल काही चांगली बातमी उन्नतीकारक घटना घडेल. अष्टमेष शुक्र अचानक आर्थिक लाभ घडवून आणेल . चतुर्थेश अष्टमात मानेच्या प्रकृतीची चिंता दाखवितो. एखाद्याचा विवाह मुळे उत्कर्ष होईल. वास्तुसंबंधी प्रकरण पुढे सरकण्यास विलंब होईल. प्रॉपर्टी संबंधी कामात अडथळे निर्माण होतील.

नोव्हेंबर डिसेंबर 9 नोव्हेंबरला गुरू लाभ स्थानी येतो .शनी गुरु शुक्र केतू प्लुटो या ग्रहांचा योग लाभात होत आहे. केतू उच्चीचा तर गुरु स्वगृहीत राहील त्यामुळे उत्पन्नात वाढ होईल. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून फायदा होईल. या काळात भावंडा संबंधित अपघाताचे प्रसंग उद्भवतील. याकाळात बांधकाम क्षेत्रात काम करणारे तसेच हॉटेल व्यवसायिक यांना लाभदायी काळ राहील.भाग्येश लाभात आल्याने पैतृक वारसा आपणास मिळण्याचे योग येतील. हे वर्ष आपणास सर्वसाधारण उत्कर्ष उन्नती देणारे राहील.

कुंभ राशीचे नक्षत्र :

घनिष्ठा, शततारका, पूर्वाभाद्रपदा

घनिष्ठा नक्षत्र स्वभाव : क्रोधी, साहसी (गू, गे)

शततारका नक्षत्र स्वभाव : कठोर, स्वाभिमानी (गाोसासीस)

पूर्वाभाद्रपदा स्वभाव : शांत, विनयशील (से, सो. दा)

घनिष्ठा नक्षत्र असणार्‍यांनी : मंगळवारी गणपतीला मंदिरात सव्वाकिलो गुळदान करावा. तसेच शनिची पूजन करावे. गणपती दर्शन करावे.

शततारका नक्षत्र असणार्‍यांनी : मारुती मंदिरात साखर ठेवावी. पिंपळाला प्रदक्षिणा घालावी. तुपाचा दिवा लावावा. पूर्वा भाद्रपदा नक्षत्र असणार्‍यांनी : सुवर्ण वर्गाचे वस्त्रदान करावे.

शुभवार : बुध, शुक्र, शनि

९,१०,८,१२ शुभ महिने

शुभ रंग : काळा, तपकिरी, पिवळा

रत्न : नीलम राशीप्रमाणे परंतु ज्योतिषाच्या सल्ल्याने रत्न धारण करावे.

भाग्योदय : वय, वर्ष ३० नंतर

Subhedar jyotishi

 

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.