Thursday, December 26, 2024

/

आजच्या सुनावणीवर ठरणार मनपा निवडणुकीचे भवितव्य

 belgaum

बेळगाव महानगरपालिकेची निवडणूक केव्हा होणार, नव्याने बनवण्यात आलेले वॉर्ड तसेच राहणार की बदलणार ? आणि नव्याने जाहीर करण्यात आलेले आरक्षण तसेच ठेवले जाणार की बदलणार ? असे अनेक प्रश्न बेळगावच्या नागरिकांच्या मनात निर्माण झाले आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरे आज कर्नाटक उच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर मिळू शकणार आहेत.

यावरूनच बेळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीचे भवितव्य ठरणार आहे .माजी नगरसेवक धनराज गवळी यांच्या नेतृत्वाखाली काही आजी माजी नगरसेवकांनी नवीन वॉर्ड रचना आणि आरक्षण याविरोधात याचिका दाखल केली. न्यायालयाने महानगरपालिकेला आपली बाजू मांडण्यासाठी वेळ देऊन न्यायालयीन प्रक्रियेला स्थगिती दिली आहे .

आज यासंदर्भात न्यायालयात सुनावणी होणार आहे. नव्याने वॉर्ड रचना करताना नागरिकांनाच अंधारात ठेवण्यात आले. त्यामुळे सगळ्या वॉर्डांची तोडफोड झाली आहे कुठला वॉर्ड कुठून सुरू होतो हे सांगणे सुद्धा कठीण झाले आहे. प्रचार करणे अवघड झाल्याने वॉर्ड धोकादायक असल्याचे सांगून काही नगरसेवक न्यायालयात गेल्यामुळे आणि त्याला माजी नगरसेवकांनी साथ दिल्यामुळे बेळगावच्या महानगरपालिका निवडणुकीचे भवितव्य अडचणीत आले.

सध्यातरी बेळगाव ची निवडणूक सहा महिने पुढे ढकलली जाईल असा अंदाज आहे. महानगरपालिका, नगरविकास खाते आणि निवडणूक आयोग कोणती भूमिका न्यायालयासमोर मांडणार यावर या निवडणुकीचे भवितव्य ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.