शहापूर पोलीस स्थानक कार्यक्षेत्रात मटका जुगार आणि बेटिंग वरील रेड धडाका सुरूच आहे मंगळवारी रात्री शहापूर पोलिसांनी बंडी मार्ग शिवारात जुगार खेळणाऱ्यां चौघांना अटक करून त्यांच्या जवळील 25 हजार पाचशे रुपये रक्कम जप्त केली आहे.
प्रसाद गोडसे रा.भातकांडे गल्ली बेळगाव गणेश गोडसे रा. भातकांडे गल्ली, जाधव रा. शास्त्रीनगर आणि शुभम पाटील रा. महाद्वार रोड अशी अटक झालेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जुने बेळगाव स्मशान भूमी जवळील बंडी मार्ग शिवारात हे सगळे जण जुगार खेळत बसले असता मंगळवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास शहापूर पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी यांनी धाड टाकून त्यांना जुगार खेळताना रंगेहाथ पकडले.या प्रकरणी शहापूर पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे.
गेल्या आठवडाभरात शहापूर पोलीस स्थानक कार्यक्षेत्रात अवैध धंद्यावर झालेली ही तिसरी कारवाई आहे. पहिल्यांदा मटका अड्ड्यावर तर दुसऱ्यांदा क्रिकेट वर बेटिंग खेळणाऱ्या वर धाड टाकून सी सी बी पोलिसांनी कारवाई केली होती