बेळगावच्या पिंपळ कट्टा परिसरात दीड किलो गांजाची विक्री करत असताना प्रिया डॉन सह तिच्या दोन साथीदारांना मार्केट पोलिसांनी अटक केली. नाजिम अल्लाउद्दीन मुल्ला, प्रियांका विनोद नंदगडकर, मुस्ताक अहमद बागवान यांना अटक करण्यात आले असून त्यांच्याकडून दीड किलो गांजा जप्त करण्यात आलाय.
मार्केट पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली असून तिघांना अटक करण्यात आली आहे.
प्रिया डॉन ही गेल्या दोन वर्षां पासून गांजा आणि पननी या अमली पदार्थ विक्रीचे रॅकेट चालवत होती मुंबईतून बेळगावात आणून हे नशेचे पदार्थ आपल्या साथीदारांसोबत विकत होती.मार्केट ए सी पी एन व्ही भरमनी यांनी अमली पदार्थ विक्री करणाऱ्या विरोधात मोहीम आखली असून या तिघांच्या जोडगोळीला त्यांनी गजाआड केले आहे. सदर अमली पदार्थ शाळा कॉलेज मधील विद्यार्थ्यांत विक्री करण्यात येत होते या कारवाई मुळे गांजा विक्री वर आळा नियंत्रण येणार आहे.