Thursday, January 9, 2025

/

कर्नल ऑफ दी रेजिमेंटनी दिली देशसेवेची शपथ

 belgaum

मराठा लाईट इन्फंट्री बेळगाव रेजिमेंटल सेंटर च्या प्रशिक्षित जवानांचा शपथविधी आज झाला. सेंटरच्या तळेकर ड्रिल चौकात ३८१ जवानांना प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर शपथ देण्यात आली.
हे जवान आता देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये सेवा देणार आहेत. परेड प्रमुख म्हणून मेजर रॉबिन अब्राहम यांनी काम पाहिले तर विजय भोसले यांनी कमांड केले.
कर्नल ऑफ दी रेजिमेंट लेफ्टनंट जनरल पी जे एस पन्नू यांनी जवानांना मार्गदर्शन करून देशसेवेची शपथ दिली .तिरंगा ध्वज आणि रेजिमेंटच्या ध्वजच्या साक्षीने मायभूमीचे रक्षण करण्याची शपथ घेण्यात आली.

शरकत लढ्याचे शंभर वर्ष आणि मराठा लाईट इन्फंट्री ला दोनशे पन्नास वर्ष सुरु होत असताना देशसेवेत दाखल होणे या जवानांच्या दृष्टीने आनंद आणि भाग्याची गोष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.

Pjs pannu
लेफ्टनंट जनरल पी जे एस पन्नू यांनी जवानांना मराठा इन्फंट्री च्या थोर इतिहासाची ओळख करून दिली शिस्त आणि शारीरिक क्षमता हेच लष्करी जवानांचे जीवन असून जवानांनी शेवटपर्यंत या गोष्टी आत्मसात कराव्यात या सेंटरमध्ये घेतलेल्या प्रशिक्षणाचा उपयोग जीवनाच्या प्रत्येक क्षणी करून घ्यावा असे त्यांनी सांगितले.

प्रशिक्षण काळात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या जवानांना ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले .स्वप्निल कुदळे, अक्षय सावंत, प्रकाश जगताप, सुनील पाटील, नागराज यांना ट्रॉफी देण्यात आल्या. जवानांचे पालक आणि लष्करी अधिकारी यावेळी उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.