बेळगाव शहराच्या दक्षिणेकडे असलेल्या कंग्राळी खुर्द ग्रामपंचायतीने बेळगाव शहर महानगरपालिकेवर बेजबाबदारपणे वागल्याबद्दल दंड लावण्याची तयारी सुरू केली आहे. शहरातील वेगवेगळ्या भागातील अनेक प्रकारची घाण व कचरा या गावच्या हद्दीतील मार्कंडेय नदीत आणून टाकण्यात येत असून नदी दूषित होत आहे. याला पूर्णपणे बेळगाव महानगरपालिकेला जबाबदार धरून दंड करण्याचा निर्णय घेण्याबाबत कंग्राळी खुर्द ग्रामपंचायतीने चर्चा सुरू केली आहे.
जिल्हा पंचायत सदस्य सरस्वती पाटील ,समिती नेते आर आर पाटील तसेच ग्रामपंचायतीच्या विद्यमान अध्यक्ष व सदस्यांनी मार्कंडेय नदीत मिसळल्या जाणाऱ्या घाणी बद्दल आवाज उठवला . एपीएमसी मधून कुजकी भाजी व इतर कचरा टाकण्यात येत होता त्यावर आवाज उठवून तो बंद करण्यात आला.
आज पुन्हा झालेल्या पाहणीत बेळगाव शहरातून कचरा, हॉस्पिटल व उपनगरांचे दूषित पाणी व मेलेल्या जनावरांच्या अवशेष आणून टाकण्यात येत असल्याचे लक्षात आले आहे.हे सर्व कारभार महानगरपालिकेच्या गलथान कारभारतून होत असून महानगरपालिकेच्या आरोग्य विभागावर दंड बसवण्याची तयारी सुरू केली आहे. महानगरपालिकेसाठी स्वतंत्र कचरा डेपो आहेत.
वेळच्या वेळी कचरा उचलून तो कचरा डेपो मध्ये टाकणे हे महानगरपालिकेचे कर्तव्य आहे. पण कर्तव्य पूर्ण केले जात नाही आणि अनेकांच्या पिण्याच्या पाण्याचे साधन असलेल्या मार्कंडेय नदीचे पात्र दुषित केले जात आहे. यामुळे आता कंग्राळी खुर्द ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत चिडली असून कारवाई होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही. असा इशारा जिल्हा पंचायत सदस्य सरस्वती पाटील यांनी दिला आहे.
खालील लिंक क्लिक करून तुम्ही पाहू शकता जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील यांनी दिलेली प्रतिक्रिया
Check out @belgaumlive’s Tweet: https://twitter.com/belgaumlive/status/1083267210880126981?s=08