गेल्या चार महिन्यापासून स्वच्छता कामगारांचा पगार न दिल्याच्या निषेधार्थ अनगोळ येथील प्रभाग क्र सहाचे नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी स्वच्छता कामगारांसह अनगोळ येथील चौकात स्वच्छता काम बंद करून आंदोलन सुरू केलं आहे.यामुळे अनगोळ मधील कचरा सफाई आज बंद आहे.
गेले कित्येक वेळा महा पालिके समोर अधिवेशना दरम्यान या सफाई कामगारांनी पगार मिळावा यासाठी आंदोलने केली आहेत मात्र पालिकेने त्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत.महापालिका आयुक्त शशिधर कुरेर यांनी माळ मारुती येथील प्लॉट विकुन पगार करतो असे आश्वासन दिले होते मात्र अद्याप त्यांना वेतन मिळाले नाही.सर्व सफाई कामगार हे रोजंदारी वर आपली चूल पेटवत असतात अश्यात पालिके कडून त्यांना त्रास दिला जात आहे असा आरोप गुंजटकर यांनी केला आहे.
2017 ला आलेल्या पालिकेच्या अध्यादेशा प्रमाणे सफाई कामगारांना बायोमेट्रिक पद्धतीनं पगार दिला पाहिजे असे असताना याचे कुठेच पालन होताना दिसत नाही या अगोदर महापौर याबाबत कल्पना दिली आहे दहा वाजता आम्ही पालिके समोर देखील जाऊन ठाण मांडणार आहोत असेही त्यांनी म्हटले आहे. पालिका आयुक्तांनी एकीकडे वार्ड कंत्राटदारांचा पगार केला असताना दुसरीकडे सफाई कामगारांना वाऱ्यावर सोडलं आहे.आयुक्तांना प्रत्येक वेळी पदोन्नती मिळत आहे सफाई कामगार मात्र वंचित आहेत त्यामुळं सरकारने डोळेझाक केली आहे असा देखील आरोप त्यांनी केला आहे.
स्वतःच्या पगारा साठी आंदोलन करणाऱ्या मजदुराना कामवरून काढून टाकू अशी धमकी एस आय कडून मिळत आहेत त्याचा देखील समाचार घेणार असे ते म्हणाले.