स्त्री शिक्षणाचा पाया रोवलेल्या सावित्रीबाई फुले जयंती निमित्त एका वंचित लेकीची शैक्षणिक फी भरून महिला आघाडीच्या वतीने अनोख्या पद्धतीने सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली.
गुरुवारी महिला आघाडी कार्यालयाच्या सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्या कार्यक्रमात महिला आघाडीच्या अध्यक्ष रेणू किल्लेकर,महिला आघाडीच्या सचिव सरिता पाटील होत्या.
महिला विद्यालय येथे इयत्ता दुसरीत शिक्षण घेत असलेली कंग्राल गलली येथील श्रेया कोकितकर हिची वार्षिक फी भरत शैक्षणिक जबाबदारी उचलली आहे.श्रेया अत्यंत गरीब परिस्थिती असल्याने सरकारी शाळेत शिक्षण घेण्याची परिस्थिती ओढवली होती मात्र महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महिला आघाडीच्या पुढाकाराने त्याच शाळेत तिला शिक्षण घेण्याची संधी मिळत आहे.यावेळी महिला आघाडीच्या सदस्या उपस्थित होत्या. अनोख्या पद्धतीने सावित्रीबाई फुले यांचा वसा जपत त्या चिमुरडीचा शैक्षणिक खर्च उचलत केल्याने त्यांचे कौतुक होत आहे.