स्मार्ट सिटी योजने अंतर्गत बेळगाव शहराचे सीटी बसस्थानक(सी बी टी)निर्माण केले जाणार असून कोल्हापूर बस स्थानका नंतर सी टी बस स्थानकाचा देखील विकसित केलं जाणार आहे. उद्या बुधवार दि 30 रोजी पासून या कामांची सुरुवात होणार आहे. सी बी टी मधून या कामाची सुरुवात होणार आहे प्रवाशांची गैरसोय लक्षात घेता सी बी टी बस आता बेळगावचे सेंट्रल बस स्थानक आणि विभागीय नियंत्रण कार्यालया समोरून सुटणार आहेत.
कोणती बस कुठून सुटणार
वायव्य कर्नाटक परिवाहन मंडळाच्या विभागीय कार्यालया समोरून अनगोळ,वडगांव,सुळगा,परमेश्वरनगर,येळ्ळूर, काकती,होनगा,आर सी यु,बी के कंग्राळी,शाहूनगर, या बस मिळतील
सेंट्रल बस स्थानक खडे बाजार रस्त्याकडे कणबर्गी,मुचंडी,चंदगड, रामतीर्थ नगर,वंटमूरी,सह्याद्रीनगर,के के कोप्प,अंकलगी,अलारवाड,चांदनहोसुर,मास्तमर्डी तारिहाळ बस्तवाड या बस मिळतील
तर सेंट्रल उप बस स्थानकात भाजी मार्केट रोडकडे म्हणजे खानापूर प्लाटफॉर्म म्हणजे यात्रा विशेष केंद्रा कडून सुळेभावी,पंत बाळेकुंद्री,देवराज अर्स कॉलनी,बसरीकट्टी,मारिहाळ, संतीबस्तवाड, किणये,कर्ले,वाघवडे, मार्कंडेय नगर,जानेवाडी,खादरवाडी, गुरू प्रसाद कॉलनी मजगाव कडे जाणाऱ्या बस मिळतील.
बुधवार 29 जानेवारी पासून हे बदल होणार असून प्रवाश्यांच्या माहितीसाठी परिवाहन खात्याने वरील माहिती उपलब्ध करून दिली आहे. उद्या पासून सी बी टी बस स्थानकाचे काम सुरू होणार असल्याने जनतेने सहकार्य करावे असे आवाहन के एस आर टी सी च्या वतीनं विभागीय नियंत्रण अधिकारी एम आर मुंजी यांनी केले आहे.