भूतरामहट्टी येथील प्राणी संग्रहालयाचा टप्प्या टप्प्याने विकास केला जाईल आगामी पाच वर्षात या उद्याना साठी पन्नास कोटी खर्च केले जातील.अशी माहिती वन पर्यावरण मंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली.
रविवारी भूतरामहट्टी येथील प्राणी संग्रहालयाच्या कम्पाउंड भिंतीच्या कामाचे भूमिपूजन केल्यावर ते बोलत होते.
या प्राणी संग्रहालयाची 1.85 की मी लांब 8 फूट उंच भिंतीसाठी राज्य सरकारने 2 कोटी निधी मंजूर केलाय त्याचे उदघाटन त्यांनी केलं. एक पर्यावरण स्थळ म्हणून याचा विकास करण्यासाठी 2 वाघ देखील इथे सोडण्यात येणार असून टायगर सफारी देखील करू असे सांगत 18 वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी यात सोडले जातील असे जारकीहोळी यांनी नमूद केलं
या प्राणी संग्रहालयास मार्कंडेय नदीतून पाणी दिले जाईल इतर व्यवस्था केली जाईल असे ते म्हणाले.यावेळी खासदार सुरेश अंगडी महापौर बसप्पा चिखलदिनी,उपमहापौर मधुश्री पुजारी,जिल्हाधिकारी डॉ एस बी बोमनहळळी,पालिका आयुक्त शशीधर कुरेर,अभियंते आर एस नाईक,डी एफ ओ अमरनाथ आदी उपस्थित होते.