नैऋत्य रेल्वेने बेळगावातील तिसऱ्या रेल्वे गेटवर ओव्हरब्रिज कामाची सुरुवात उद्यापासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भातील उद्घाटनाचे निमंत्रण पत्र रेल्वे विभागाने काढले आहे .381 क्रमांकाच्या लेव्हल क्रॉसिंग वरील चार पदरी रेल्वे ब्रीज होणार असून याला मध्यभागी पिलर असतील.
जुन्या धारवाड रोड प्रमाणेच या ब्रिजचे काम होणार आहे हा बेळगाव शहरातील चौथा रेल्वे ओव्हर ब्रिज ठरणार असून कपिलेश्वर ,जुना धारवाड रोड आणि नुकताच उद्घाटन झालेला गोटे सर्कल येथील ब्रिज त्याचबरोबरीने आता तिसरा गेटवरील मोठा चार पदरी रेल्वे ब्रीज उपलब्ध होणार आहे. आता पुन्हा एकदा रहदारीचा प्रश्न निर्माण होणार आहे रेल्वे गेट बंद झाले १८ ते २४ महिन्याच्या काळात ते बंद राहील खानापूर रोड येथे पिलरचे बांधकाम होणार असून यावेळी रहदारीच्या समस्या वाढणार आहेत.
उद्यमबाग कडे जाणाऱ्या आणि तेथून येणाऱ्या लोकांना खानापूर रोड चा पर्याय शिल्लक राहणार नाही. त्यामुळे दुसऱ्या रेल्वे गेट वरूनच जावे लागणार आहे याबाबत कोणती उपाययोजना राबवण्यात आली याची माहिती अजून मिळालेली नाही. एकीकडे सूत्रां कडून उद्या काम सुरू होणार असल्याची माहिती मिळत असली तरी रेल्वेच्या वेबसाईटवर अजूनही 381 ब्रिज टेंडर दिलेला आहे याची माहिती देण्यात आली नाही.