कामगार संपाच्या पहिल्या दिवशी विद्यार्थी आणि शिक्षणाच्या सुरक्षेसाठी बेळगाव शहरातील सर्व शाळा सुट्टी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता त्यामुळे बुधवार पासून सर्व शाळा पूर्ववत सुरू राहतील अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ एस बी बोमनहळळी यांनी दिली आहे.
शिक्षणाचा विचार करून संपांच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी शाळा कॉलेज सुरू राहतील त्याना सुट्टी दिली जाणार नाही असे कळवले आहे.
बंदमुळे जिल्ह्या डेपोला 68 लाखांचे नुकसान
बंदमुळे NWKSRTCला 4 कोटी 80 लाखांचा फटका तर बेळगाव जिल्ह्याला एका दिवसात 68 लाखांचे नुकसान झाले असल्याची माहिती NWKSRTC मुख्य व्यवस्थापक शांतप्पा गोखंडकी यांनी दिली.
NWKSRTCच्या 8 डिव्हिजन मधील 3550 पैकी 155 बस सुरू होत्या तर बेळगाव चिकोडी डिव्हिजनला 68 लाखांचे नुकसान झाले असल्याचीही ते म्हणाले.उद्या बुधवारी देखील NWKSRTC कामगारांच्या बंद आंदोलनात सहभागी झाले असून बुधवारी देखील संप चालूच असणार आहेत. मात्र शहरातील बस सुरू रहाण्याची शक्यता आहे.उद्या बुुधवारी शहरातील ऑटो सुरू असतील.