belgaum

डी सी राजप्पा यांची तडकाफडकी बदली

0
980
K rajendra prasad cop
 belgaum

बेळगावचे पोलीस आयुक्त डी सी राजप्पा यांची तडकाफडकी बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी डी आय जी पी राजेंद्र प्रसाद यांची नियुक्ती करण्यात आली आहे .

राज्य सरकारने बजावलेल्या आदेशात राजप्पा यांना कोणतीही पोस्टींग दिली नाही मात्र वायरलेस विभागाचे एस पी म्हणून कार्यरत असलेल्या पी राजेंद्र प्रसाद यांना डी आय जी पदी पदोन्नती देऊन बेळगाव आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

K rajendra prasad cop

पी राजेंद्र प्रसाद हे 2005 सालीच्या बॅचचे आय पी एस अधिकारी आहेत राजप्पा यांनी 1 जानेवारी 2018 साली बेळगाव आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला होता विधानसभा निवडणूक काळा व्यती त्यांनी जवळपास एक वर्ष हे पद सांभाळलं आहे. आगामी तीन महिन्यांत ते सेवा निवृत्त होणार होते त्याआधीच त्यांची बेळगावातून बदली करण्यात आली आहे.आगामी लोकसभा निवडणुकी अगोदर त्यांची बदली होणार होती मात्र निवडणुकीअगोदरच झाल्याने याबद्दल चर्चा सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.