बेळगाव शहर आणि परिसरात आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सगळीकडे झेंडावंदन कार्यक्रम झाले. सकाळी लवकर भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील महत्वाचा दिवस बेळगावकरांनी साजरा केला.
जिल्हा प्रशासनाचा कार्यक्रम सुरू झाला आणि इतर ठीकाणी शाळा, कॉलेज व सरकारी आणि खासगी इमारतींवर भारतीय तिरंगा ध्वज फडकवण्यात आला. नेेहरू स्टेडियम वर पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी धवाजरोहन केलं यावेळी शानदार परेड पथसंचलन आयोजीत करण्यात आले होते.
भारत माता की जय असे म्हणत शाळकरी मुलांनी भारतीय सुजाण नागरिक होण्याची शपथ घेतली.प्रजासत्ताक दिन म्हणजे भारतीय नागरिकांसाठी राष्ट्रीय सण. यादिवशी भारतीय राज्य घटनेला मान्यता मिळाली. भारत एक प्रजासत्ताक राष्ट्र बनले. १९५० पासून आजवर हा दिन देशात साजरा केला जातो.
भारतीय स्वातंत्र्य लढ्यात बेळगावच्या अनेक नागरिकांनी आपले योगदान दिलेले आहे. भारत स्वतंत्र व्हावा या इच्छेने प्रेरित होऊन अनेकांनी सत्याग्रही मार्गाने लढा दिला आहे. बेळगावच्या या लढाऊ बाण्याने आज तिरंगा ध्वज फडकवून देशाच्या सार्वभौमत्वाला नमन केले आहे.