नवी दिल्ली येथे युवजन सेवा आणि क्रीडा खात्याच्या नेहरू युवा केंद्र संघटनतर्फे आयोजित राष्ट्रीय पातळीवरील वक्तृत्व स्पर्धेत बेळगावच्या प्रणव विलास अध्यापक याने तृतीय क्रमांक पटकावला.युवजन सेवा आणि क्रीडा खात्याच्या सचिव उपमा चौधरी यांच्या हस्ते प्रणव याला पन्नास हजार रु.चा धनादेश आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते देखील प्रजासत्ताक दिनाच्या एका विशेष कार्यक्रमात ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.राष्ट्रभक्ती आणि राष्ट्र निर्माण असा वक्तृत्व स्पर्धेचा विषय होता.
राज्य पातळीवर संपूर्ण देशात घेण्यात आलेल्या प्रत्येक राज्यातील प्रथम क्रमांकाचे विजेते तीन मूर्ती भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धेत सहभागी झाले होते.एकूण एकोणतीस स्पर्धकानी राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत सहभागी होऊन आपले विचार मांडले.स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी युवजन सेवा आणि क्रीडा खात्याचे मंत्री राजवर्धन राठोड यांनी उपस्थिती दर्शवून स्पर्धकांशी संवाद साधला.
प्रणव हा जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेजमध्ये एम बी बी एस च्या अंतिम वर्षात शिकत असून राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत त्याने कर्नाटकचे प्रतिनिधित्व केले होते.यापूर्वीही राष्ट्रीय पातळीवरील युवा महोत्सवात प्रणव याने पारितोषिके मिळवली आहेत.त्याला जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेजच्या प्राचार्या डॉ.एन.एस.महांतशेट्टी ,उप प्राचार्य डॉ.व्ही.ए.कोठीवाले,डॉ.आर.एस.मुधोळ,डॉ.ए.पी.होगाडे ,डॉ.रेखा मुधोळ,डॉ.रवींद्र होन्नुगर ,डॉ.अश्विनी नरसण्णवर ,डॉ.शिवस्वामी एम.एस.यांचे मार्गदर्शन लाभले.पत्रकार विलास अध्यापक यांचा तो सुपुत्र आहे