आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी देशभरातील कामगार संघटनांनी पुकारलेल्या बंदला बेळगावात प्रतिसाद मिळत आहे.अखिल भारतीय संपाच्या या हाकेला साथ देत परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यासह रिक्षा चालक व मालक व इतर कामगार बंदमध्ये सहभागी झाले आहेत.संपामुळे बेळगाव शहरासह ग्रामीण भागातील बस सेवा ठप्प झाली आहे, तसेच बंदमुळे शाळा आणि महाविद्यालयाना सुट्टी देण्यात आली आहे तसेच बारावी पूर्व परीक्षा आणि व्हीटीयूचे पेपर पुढे ढकलण्यात आले आहेत. त्यामुळे शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत आहे.
बस बंद असल्याने बस स्थानकात प्रवाशांना ताटकळत बसावे लागले आहे, तसेच अनेकांना पायपीट करावी लागत आहे .संपामुळे शहरातील केंद्र व राज्य सरकारी कार्यालयांच्या कामकाजावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. बँक कर्मचारी संपात सहभागी होणार आहेत, त्यामुळे नागरिकांना एटीमवर अवलंबून रहावे लागणार आहे. त्यामुळे काही एटीएमसमोर सकाळपासूनच गर्दी दिसून येत आहे.
खासगी क्षेत्रातील कामगार संघटनाही संपात उतरल्याने खासगी क्षेत्रावरही परिणाम होणार आहे. तसेच सार्वजनिक बँका, विमा कंपन्या, संरक्षण उत्पादन कारखाने, पोस्ट, बीएसएनएल, केंद्र-राज्य सरकारी कार्यालये, आरोग्य विभाग, आशा कर्मचारी, हमाल, बाजार समिती, वाहतूक, परिवहन, रिक्षाचालक आदी संपात सहभागी झाले आहेत.त्यामुळे कामकाजावर मोठा परिणाम होणार आहे
मंगळवारपासून कामगार संघटनांनी दोन दिवसीय संप पुकारला आहे अशातच गेल्या 3 महिन्यांपासुन पगार न मिळाल्याने पाच प्रभागातील सफाई कर्मचाऱ्यांनी कचरा उचल न केल्यामुळे सकाळपासुन कचरा तसाच पडुन आहे. त्यामुळे शहरवाशियांमधुन नाराजी व्यक्त होत आहे.