(राशीस्वामी- बुध)
|| अपेक्षापूर्तीचे वर्ष ||
राशी वैशिष्ट्ये
कन्या ही कालपुरुष कुंडलीतील सहाव्या क्रमांकाची राशी आहे. या राशीचा स्वामी बुध आहे. या राशीच्या अंमल दक्षिणेकडे असतो. या राशीचे लोक बुद्धिमान असतात. हस्तकुशल, भावनाप्रधान,हळव्या मनाच्या असतात. यांच्या बुद्धिमत्तेमध्ये चौकस व चिकित्सकपणा असतो. संशयिवृत्तीच्या, हिशोबी, मनाचा अंत लागू न देणाऱ्या असतात.
स्वभाव वैशिष्ट्ये
या राशीच्या व्यक्तींना सौदर्याची विशेष आवड असते.रसिक वृत्तीच्या असतात. थोड्या लहरी स्वभावाच्या असतात. एखाद्या गोष्टींच्या तळापर्यंत जाणे त्याचे मर्म शोधून काढणे हे त्याचे वैशिष्ट्य असते. कमी वयातच त्यांना व्यवहार ज्ञान संपादन होते. आपल्या बुद्धीचा पुरेपूर उपयोग या व्यक्ती करतात. त्यांची स्मरण शक्तीही दांडगी असते. भावनाप्रधान असतात.
दुसऱ्यामधील उणीव शोधून काढण्यातही हुशार असतात.गूढ विषयांची आवड असल्यामुळे कुठलीही गोष्ट शोधून काढण्यात अगदी चतुर असतात. कुटुंबापेक्षा यांना समाजात जास्त मान मिळतो. या तशा समाजप्रिय असतात. सामाजिक कार्यात भाग घेणे यांना आवडते, मित्रा परिवार मोठा असतो. परंतु यांना गुप्त शत्रूपासून त्रास होतो. वकील, व्यापारी, बौद्धिक क्षेत्र, गुन्हेशोधक, आयकर या क्षेत्रात हे लोक विशेष काम करतात. यांना पोटाचे विकार होतात. गुडघेदुखीचा त्रास होतो, पित्ताचे विकार आढळतात.
वार्षिक ग्रहमान
वर्षाच्या सुरुवातीला आपल्या राशीच्या चतुर्थ स्थानात शनी आहे .तो वर्षभर राहील तर गुरु तृतीयात राहील .मार्चला धनुत व नंतर २२ ला पुन्हा वृश्चिकेत व ९ नोव्हेंबरला धनुत येईल. वर्षभर या दोन स्थानातच गुरूचे वास्तव्य राहील. तृतीयात गुरु शुक्र संमिश्र फलदायी राहील .गुरूला तृतीय स्थान लाभकारक नसले तरी तो फारसा वाईट फळे देणार नाही. एखादे लहान सहान आजारपण देईल.एखाद्या कामात अतिपरिश्रमानंतर यश देईल. परंतु येथे शुक्र असल्याने काही चांगली फळे देखील मिळतील. तृतीयेश शुक्र मानसन्मानात वाढ करेल. धनवृद्धी, शत्रुनाश करवितो. आप्तेष्टांच्या भेटीगाठी होतील .जवळचे प्रवास सुखकर होतील .स्त्रियांना मुलांना आपल्या आवडत्या वस्तूंचा लाभ होईल .नोकरदारांना वरिष्ठांकडून प्रशंसा होईल. व्यापारी लोकांना नवीन आर्थिक गुंतवणूक फायद्याची ठरेल.
फेब्रुवारीत अष्टमस्थानात होणारा मंगळ हर्षल योग अपघाताचे योग आणेल. या काळात वाहन जपून चालवावे .या काळात नैराश्य निर्माण होणे ज्वरपीडा, जखमा होणे जीवावर बेतण्याचे प्रसंग उद्भवतील. याकाळात विशेष सावधगिरी बाळगावी. विशेष करून कन्या राशीच्या लहान मुलांची काळजी घ्यावी. कारण या काळात लग्नेशही षष्ठ स्थानात म्हणजे रोग स्थानात आहे.
मार्च-एप्रिलमध्ये सप्तमात बुध शुक्र युती मिनेत असल्याने विवाह साठी हा शुक्र अनुकूल राहील. भागीदारी व्यवसायात यश देणारा राहील. राजकारणी लोकांना दशमातला राहू उत्तम फलदायी राहील. सत्ता अअधिकार यांचा लाभ निवडणुकीत यश देणार्या मोठ्या लोकांच्या ओळखी वाढतील परंतु उद्योगधंद्याच्या दृष्टीने उलथापालथ करणारा राहील. संततीसंबंधी क्लेश निर्माण करेल.
मे महिन्यात अष्टमात येणारा बुध शुक्र हा योग धुरंदरपणा देईल. काही आर्थिक फायदे होतील. मृत्युपत्र अथवा भागीदारीतून फायदे होतील. विवाहितांना सासरवाडी कडून काही आर्थिक लाभ होतील या काळात एखादी प्रॉपर्टी खरेदी कराल. स्त्रीयांना दागिन्यांची हौस पुरवता येईल. खरेदीचे योग येतील. मंगळ राहू बुध दशमात येतील तेंव्हा नोकरीत त्रास वादविवादाचे प्रसंग उद्भवतील. एखाद्या कामात निरर्थक परिश्रम करावे लागेल. चोरभय दाखवेल.
जुलैत दशमातील रवि शुक्र आपणास चांगला राहील. सरकारी नोकरी, व्यापारी, मोठे उद्योजक यांच्यासाठी लाभदायी राहील. नवीन क्षेत्रात संधी उपलब्ध होतील .मागे अर्धवट राहिलेली कामे पुढे सरकतील समाजात मान-सन्मान वाढेल. हाताखालील व्यक्तींचे सहकार्य लाभेल.
ऑगस्टमध्ये व्ययातला मंगळ असल्याने कर्ज प्रकरणे होतील. पैशाचा अपव्यय होईल. डोळ्याचे त्रास येतील. पाळीचे त्रास जाणवतील. रागावर नियंत्रण राहणार नाही. तरुणांनी या काळात नको त्या गोष्टींच्या आहारी जाऊ नये मित्रांमधले मतभेद काही अनिष्ट प्रकार घडवू शकतील. स्त्रियांनी वैवाहिक जोडीदाराशी जमवून घ्यावे लागेल. धार्मिक दृष्टीने तसेच व्ययात मंगळ विवाहबाह्य संबंध निर्माण करू शकतो त्यामुळे वैवाहिक जीवनात वादळाचे प्रसंग येऊ शकतात. देवघेवीच्या व्यवहारात बुडवणारा काळ असल्याने असे व्यवहार करताना चौकसपणा ठेवावा.
ऑक्टोबर मध्ये राशीत येणारा मंगळ पोटाचे विकार देईल. वयस्कर मंडळींनी याकाळात खण्यापिण्यावर नियंत्रण ठेवावे. द्वितीयात रवी शुक्र बक्षीस रूपाने काहीतरी मिळवून देईल. कोर्ट कचेरी संबंधी अर्धवट कामे पूर्ण होतील.
डीसेंबर मध्ये चतुर्थात सहा ग्रहांचे
वास्तव्य राहील. मातेचे सौख्य या काळात लाभेल. नवीन वास्तू खरेदीचे योग येतील. ज्यांच्या वास्तू जुन्या आहेत त्यात काही चांगले बदल करवून घेतील. वर्ष संपता संपता काही चांगले लाभ होतील. सहकुटुंब सहपरिवार सहलीचा आनंद घ्याल.या महिन्यात केलेले आर्थिक नियोजन पुढच्या काळासाठी उपयोगी ठरेल.
.
काही महत्वाचे
# कन्या राशीतील नक्षत्रे: उत्तरा, हस्त, चित्रा
#उत्तरा स्वभाव : तेजस्वी, स्वाभिमानी नाम अक्षर : हो, प, पी
# हस्त स्वभाव : उत्साही, विनम्र नाम अक्षर : पू, ष, ण, ठ
#चित्रा स्वभाव : रागीट,जिज्ञासू नाम अक्षर: पे, पो
उपासना
# उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींनी पूर्ण काळ्या गाईला चारा घालावा. व्यंकटेश स्तोत्राचा पाठ करावा.
# हस्त नक्षत्राच्या व्यक्तींनी सोमवारी दूध दान करावे. सुर्यष्टक स्तोत्र वाचावे
#चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींनी मंगळवारी जिलेबी दान करावी. गणपती अथर्वशीर्ष वाचावे.
# विध्यार्थी वर्गाने अथर्वशीर्ष वाचावे, या राशीच्या विद्यार्थ्याने सूर्याला अर्ध्य ध्यावे, यशप्राप्ती होईल.
# भाग्यरत्न राशीप्रमाणे पाचू
कुंडलीतील ग्रहस्थिती नुसार रत्न धारण करावे. त्यासाठी योग्य ज्योतिषाचा सल्ला घ्यावा.
# शुभवार : बुधवार, गुरुवार, शुक्रवार
# शुभमहिने : ऑगस्ट, ऑक्टोबर, फेब्रुवारी, जून
#रंग : पंधरा, आकाशी, हिरवा
( भाग्योदय वयाच्या २३ते ४१ या काळात होईल)