वृश्चिक(scorpio)
(राशीस्वामी- मंगळ)
|| सुखदुःखाची शिदोरी ||
राशी वैशिष्ट्ये
वृश्चिक ही कालपुरुष कुंडलीतील आठव्या क्रमांकाची राशी आहे. या राशीचा स्वामी मंगळ आहे. या राशीचे स्वामित्व उत्तरेला असते. या राशीचे लोक उत्साही, साहसी, हट्टी, उतावीळ स्वभावाच्या तसेच आतल्यागाठीच्या असतात. हे लोक मनाचा अंत लागू देत नाहीत.
स्वभाव वैशिष्ट्ये
यांच्यात तप्तपणा, हेकेखोरपणा दिसून येतो. या व्यक्ती विशेष करून कुणाच्या प्रभावाखाली राहत नाहीत. या राशीच्या स्त्रिया दिसण्यात उंच, गहुवर्णीय, क्वचित गौरवर्णीय तसेच थोड्या फटकळ स्वभावाच्या परंतु कष्टाळू वृत्तीच्या, काटकसरी स्वभावाच्या, थोड्या अहंकारी स्वभावाच्या महत्वाकांक्षी व स्वाभिमानी असतात.
या लोकांची वृत्ती साहसी व कष्टाळू असल्याने आशा व्यक्ती पोलीस, मिलिटरी, अग्निशामक तसेच गुप्तहेर खाते यात काम करताना आढळतात, मेकॅनिकल क्षेत्रात या विशेष दिसतात, यात दोन प्रकारचे स्वभाव आढळतात, एक चांगल्या वृत्तीचे प्रामाणिक तर दुसरे गुन्हेगारी प्रवृत्तीचे, राजकारणातही हे लोक दिसून येतात.
वार्षिक ग्रहमान
वर्षाच्या सुरुवातीला शनि आपल्या राशीच्या दुसऱ्या स्थानात आहे तो २४ जानेवारी २०२० ला मकरेत जाईल तोपर्यंत वृश्चिकेला साडेसातीचा काळ आहे. २४ जानेवारी २०२० ला आपली साडेसाती संपते. साडेसातीचा शेवटचा टप्पा मोठा कष्टकारक असला तरी यातून तुमची सुटका लवकर होणार आहे. आपला खडतर प्रवास संपणार आहे तेव्हा येत्या जानेवारी महिन्यात व फेब्रुवारी महिन्यात सुरू गुरु शुक्र वृश्चिक राशीत असल्याने या काळात आपणास मानसिक आनंद प्राप्त होईल. छानचौकीपणा वाढेल. दीर्घ दुखणे निर्माण होऊ शकते. आशावादी दृष्टिकोन राहील . नोकरीत असणाऱ्यांना कामानिमित्त परदेशी जावे लागेल. आप्तांशी विशेष जमणार नाही. गुरुमुळे धार्मिक गोष्टी घडतील. तर काही मध्ये वृश्चिकेचा शुक्र स्त्रियांबद्दल आकर्षण निर्माण करेल .या काळात संयम ठेवा . द्वितीयातला शनि प्लूटो कुटुंबाची हेळसांड करेल. एखाद्या जातकाला स्वतःच्या चुकीमुळे नोकरीत आपले पद सोडण्याची पाळी येईल . अपमानास्पद वागणूक मिळणे .नोकरीत अडथळे येतील. विष बाधा होणे ,जखमा होणे, द्वितीयात शनि सौख्यात कमतरता देतो त्यामुळे या काळात हेकेखोरपणे वागू नका.
मार्च एप्रिल आपल्या बलस्थानात येणारा मंगळ हर्षल मेषेत स्वराशीतला असल्याने शत्रूवर विजय मिळवाल. दगदगीचा काळ राहील. वृत्ती थोडी भांडखोर होईल . मामा बद्दल एखादी चांगली बातमी मिळेल . षष्ठात शष्ट्येश आला असता हर्षयोग म्हणतात. प्रकृती संपत्ती किर्तीला बरा असतो. तरी या बरोबर हर्षल आहे त्यामुळे येथील मंगळ हर्षल व्ययाला बघतो .दृष्टिदोष निर्माण करेल. नोकरवर्ग पासून त्रास होईल. हाताखाली लोक विश्वास दाखवणार नाहीत .हर्षल मंगळ योग बाहेरील बाधा तसेच डॉक्टरला निदान न होणारे आजार होण्याचा संभव येतो. मेंदूला इजा होणे डोळ्याचे आजार मानसिक दुर्बलता देईल. परंतु भागीदारीत लाभदायी तीर्थयात्रा घडवेल. प्रवासात थोड्या अडचणी देईल. चतुर्थ स्थानातला बुध विद्याभ्यासासाठी विद्यार्थी वर्गाला चांगला राहील.
मे जुन याकाळात तुमच्या राशीचा शष्टेश अष्टमात व अष्टमेश षष्ठात येतो. तो षष्ठेश अष्टमेश परिवर्तन योग विपरीत राजयोगाची फळे देतो. वाईट स्थानाचे स्वामी दुसऱ्या वाईट स्थानाच्या स्वामीशी परिवर्तन करतात.(two negatives make one positive) त्यामुळे या काळात बरीच चांगली फळे पदरात पडतील . संपत्तीच्या बाबतीत ही काहीशी चांगली फळे मिळतील .व्यवसायिक नोकरदारांना यांचा फायदा होईल. या योगाचा उत्तम फायदा करून घ्यावा वर्षाची सुरुवात मध्यम असली तरी यावर्षी सुखदुःखाची शिदोरी घेऊन पुढे मार्गक्रमण येणारा काळ तुम्हाला सोनेरी किरणे देऊन जाईल त्यासाठी येणाऱ्या वेळेची प्रतीक्षा करणे हेच या वर्षी सांगता येईल.
जून अखेरपर्यंत शुक्र आपल्या राशीच्या सप्तमस्थानात राहील .सौंदर्य कारक वस्तूंचे व्यापारी स्त्रियांना सौख्यदायी राहील. कौटुंबिक सुखात वाढ करेल. अविवाहितांचे विवाह यावर्षी जमतील. गुरु शुक्र लग्न सप्तमात आल्याने वैवाहिक दृष्ट्या तरुण-तरुणींना चांगला काळ राहील .
जुलै-ऑगस्टमध्ये सप्तमातला शुक्र अष्टमात रवि शुक्र राहू युतीत येतो. त्यामुळे रवीला स्थान चांगले नसले तरी शुक्र अष्टमात बलस्थान वारसाहक्काने काहीतरी देईल. विवाहामुळे पैसा किंवा भाग्योदय येथे होईल . कमी श्रमात जास्त पैसा अष्टमेश शुक्र देईल. राहू नेप दूषित असल्याने आणि ते कारण आहे रवी अनीतीकारकपणा देईल. रवी अकारण खर्च उधळपट्टी करवू शकतो. वडिलांच्या प्रकृतीची चिंता राहील. जुलै डिसेंबर ग्रहण आपणास मिश्र फळ देईल .सप्टेंबर-ऑक्टोबर ला रवी मंगळ आपल्या राशीच्या दशमात येईल तर लग्नी गुरु चतुर्थस्थानात असा योग लष्करी पोलिस दल या ठिकाणी काम करणाऱ्याना चांगला आहे .सरकारी नोकरीत असणाऱ्या बढतीचे योग येतील सरकारी नोकरीच्या शोधात असतील त्यांना नोकरी मिळेल .राजकारणी लोकांना एखादे पद प्राप्त होईल .मानसन्मान मिळेल .वडिलांचे सौख्य लाभेल .व्यापारात प्रगती होईल. बांधकाम व्यवसायिक तसेच इलेक्ट्रिकल व कारखाने या व्यावसायिकांना काळ चांगला राहील.
नोव्हेंबर-डिसेंबर व्ययातला रवि शुक्र रविला नीच व शुक्र उच्चीचा होतो. रवीचा नीचभंग होतो .तेव्हा रवी प्रकृती चिंता निर्माण करेल. वडिलांची काळजी करावी. तो शुक्र उच्च असल्याने काही त्याची चांगली फळे देईल .धार्मिक कार्य घडवेल .हर्षलच्या प्रतियोगात असल्याने काही लोकांमध्ये बाह्यखालीपणा देऊ शकतो . वैवाहिक सुखास चांगला नाही. परंतु आयात निर्यात व्यवसाय संबंधित व्यक्तीना शुक्र चांगली फळे देईल .स्त्रियांना लग्नेश द्वितीयेश परिवर्तन योग मित्रांकडून मैत्रिणींकडून लाभकारक राहील .मित्रांचे सहकार्य याकाळात लाभेल .हे वर्ष एका हातात सुख तर दुसऱ्या हातात थोडे दुःख श्रम देणारे राहील .
परीक्षेचा काळ संपत आला आहे येणाऱ्या वेळेची प्रतीक्षा करणे हेच ध्येय ह्या वर्षात ठेवावे.
काही महत्वाचे
# वृश्चिक राशीतील नक्षत्रे: विशाखा, अनुराधा, ज्येष्ठा
# विशाखा स्वभाव : जिज्ञासू, भावूक नाम अक्षर : तो
# अनुराधा स्वभाव : न्यायप्रिय, हत्ती नाम अक्षर : ना, नी, नू, ने
#ज्येष्ठा स्वभाव : शीघ्रकोपी, ऐश्वर्यशाली नाम अक्षर: नो, या ,यी, यउपासना
# विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींनी मंगळवारी तांब्याची वस्तू दान करावी. सप्तशनी पाठ करावा.
# अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींनी बेडशीट किंवा चादर गरिबाला दान करावी. अथवा गणपती मंदिरात सव्वाकिलो गुळ द्यावा. शनी स्तोत्र वाचावे.
# विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींनी पादत्राणे दान करावे.. सप्त शनीचे पाठ वाचावे. विष्णूसहस्त्र नाम वाचावे.
# भाग्यरत्न राशीप्रमाणे पोवळे
कुंडलीतील ग्रहस्थिती नुसार रत्न धारण करावे. त्यासाठी योग्य ज्योतिषाचा सल्ला घ्यावा.
# शुभवार : मंगळवार, गुरुवार, शुक्रवार
# शुभमहिने : जानेवारी, मार्च, एप्रिल, जुलै
#रंग : तांबडा, नारिंगी, गुलाबी
( भाग्योदय वयाच्या २७ या वर्षांपासून होईल)