बेळगाव महानगरपालिकेच्या वॉर्डांची पुनर्रचना आणि आरक्षण बदलासंदर्भात कर्नाटक उच्च न्यायालयात घालण्यात आलेल्या दाव्याची सुनावणी आज होणार होती.पण ती न्यायालयीन कामकाज दुपारी होऊ न शकल्याने उद्या शुक्रवारी साठी पुढे गेली आहे.
निवडणूक आयोग महानगरपालिका आणि नगर विकास प्रशासनाने आपली बाजू मांडल्यानंतर उच्च न्यायालय याबद्दल निर्णय देणार आहे .
सध्या उच्च न्यायालयाने महानगरपालिकेच्या निवडणूक प्रक्रियेवर स्थगिती आणली असून जोपर्यंत निकाल होत नाही तोपर्यंत निवडणूक भवितव्य अंधारात आहे.
माजी नगरसेवक धनराज गवळी यांच्या नेतृत्वाखाली आजी-माजी नगरसेवकानी हा दावा दाखल केला आहे .महानगरपालिकेने अतिशय चुकीच्या पद्धतीने वॉर्ड पुनर्रचना केल्याचे त्यांचे म्हणणे असून या संदर्भात न्यायालयाने निकाल द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे त्याचबरोबर आरक्षण बदल करताना सुद्धा चुकीचे निर्णय घेण्यात आल्याचा आरोप या दाव्यामध्ये आहे.
यासंदर्भात न्यायालयाने महानगरपालिका नगर विकास प्रशासन आणि निवडणूक आयोगाला आपले म्हणणे मांडण्यास वेळ दिला पण अजून म्हणणे मांडलेलं नाही तर निवडणूक आयोगाने लवकर निकाल लावून निवडणूक घेण्याचा मार्ग मोकळा करा अशी मागणी केली आहे.पुढच्या तारखेला तरी मनपा व नगरविकास खाते आपली बाजू मांडेल अशी अपेक्षा आहे.
शुक्रवारी दुपारी नंतर हा दावा सुनावणीला येणार आहे.