बेळगाव तालुक्याच्या काही भागात धर्मांतरणाच्या घटना वाढू लागल्या आहेत. एका विशिष्ट समाजाच्या संस्थांनी गोरगरीब जनतेला आपल्या धर्मात येण्यासाठी गळ घालून त्यासाठी काही लाखांची रक्कम देण्याचा प्रकार घडत आहेत. यामुळे अनेक जण धर्मांतराकडे वळत असून यातून कोणतीही घटना घडू नये व धर्मांतरण करणाऱ्यांवर टाच आणली जावी अशी मागणी होत आहे.
जवळच्याच चंदगड तालुक्यातील घटना घडली असून प्रार्थनासभेच्या नावाखाली धर्मांतरित व्यक्तीच्या घरी जमलेल्यांना व त्या धर्मांतरीत व्यक्तीला जबर मारहाण करण्यात आली. या प्रकरणी कोल्हापूर पोलिसांनी सात ते आठ जणांना अटक केली होती .अटक करण्यात आलेले युवक धर्माचे बचाव काम करत होते .
अशा प्रकारच्या युवकांची संख्या वाढत असून धर्मांतरण करणाऱ्यांवर त्यांचे बारीक लक्ष आहे . धर्मांतरण करणाऱ्यांवर हल्ले होण्याची शक्यता जास्त असून अशा घटना घडू नयेत याची योग्य ती खबरदारी पोलिसांना घ्यावी लागणार आहे. धर्मांतरण करणाऱ्या व्यक्ती पैशाचे आमिष दाखवत आहेत. काही विदेशी संघटना यामध्ये असून त्या आपल्या स्थानिक व्यक्तींच्या मदतीतून प्रत्येकी पाच लाख रुपयांचे आमिष दाखवत आहेत. या पैशाच्या मोहाला बळी पडून अनेक जण आपला धर्म सोडण्याच्या तयारीत आहेत बेळगाव तालुक्याच्या दक्षिण भागात असलेल्या परिसरात सध्या काही जणांनी आपले धर्मांतरण केल्याची माहिती मिळत आहे. यासाठी लाखो रुपये देण्यात आले होते. आता धर्मांतरित झालेल्या व्यक्ती इतरांना बोलावून घेऊन धर्म बदलण्यासाठी भाग पाडू लागले आहेत.
धर्म रक्षक संघटनांच्या प्रतिनिधींना माहिती कळाल्यानंतर त्यांनी आपल्या धर्मात राहा अशी जागृती सुरू केली असली तरी असे गैरप्रकार करणाऱ्यांना चांगलाच चोप देण्याची तयारी सुरू आहे. यातून हिंसाचाराच्याच्या घटना घडू नयेत यासाठी पोलिसांनी लक्ष द्यावे आहे.
बेळगाव शहरात वेगवेगळ्या भागात विविध जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदाने राहतात. प्रत्येकाला आपल्या धर्माचा आदर आहे .प्रत्येक जण स्वतःच्या धर्मानुसार धार्मिक प्रथा आणि परंपरा निभावत असतो पण दुसर्या धर्माच्या लोकांना आपल्या धर्मात घेऊन आपला धर्म वाढविण्यासाठी लाखो रुपये खर्च करणार्या व्यक्ती बद्दल धर्म रक्षक संघटनांमध्ये संताप आहे. असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत असे ही मंडळी सांगत आहेत. आपल्या धर्माचा प्रचार आणि प्रसार करून हिंदू धर्मातील व्यक्तींना धर्म सोडण्यास भाग पाडले जाणाऱ्यांवर हा संताप असून पोलिसांनी वेळीच लक्ष दिल्यास धर्मांतर करणाऱ्यांवर चाप बसू शकेल.