गेले चार महिने पगार न झालेल्या शहरातील महापालिकेच्या कचरा स्वच्छ करणाऱ्या शहरातील सफाई कर्मचाऱ्यांनी कचरा रस्त्यावर फेकून निषेध व्यक्त केला आहे.ओल्ड पी बी रोड वर फॉरेस्ट ऑफिस नजीक आणि चव्हाट गल्लीत लोकांनी कुंडात जमा केलेला कचरा रस्त्यावर फेकला आहे.
गेले कित्येक दिवस हे सफाई कर्मचारी आंदोलन करत आहेत मात्र पालिकेचे अधिकारी याबाबत उदासीन आहेत.गेल्या आठवड्यात नगरसेवक विनायक गुंजटकर यांच्या नेतृत्वात कर्मचाऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले होते.
सफाई कर्मचारी संघटनातुन एकी झाली असून उग्र आंदोलन छेडण्याच्या तयारीत आहेत इतकेच काय तर पगार मिळवण्यासाठी कोर्टात याचिका दाखल करण्याची देखील सफाई कामगारांनी केली आहे.
एकीकडे स्मार्ट सिटीचा कोट्यवधी निधी पडून असताना स कचऱ्याची उचल करणाऱ्या गोर गरीब कामगारांना अशी वेळ येऊ नये स्मार्ट बेळगावची हीच लक्षण आहेत का?असा देखील प्रश्न विचारला जात आहे.