अधिवेशन तीन दिवसांवर आलेले असताना सध्या बेळगाव आणि परिसरातील रिसॉर्ट ना चलतीचे दिवस आले आहेत. प्रायवेट फार्म हाऊस आणि रिसॉर्ट मध्ये राहण्याचे बुकिंग जोरात सुरू आहे. आडमार्गावर असलेल्या रिसॉर्ट ची मागणी जास्त आहे. आर्थिक व्यवहार आणि चोरीचे व्यवहार करण्यासाठी लॉज किंव्हा इतर वसतिस्थान धोक्याचे ठरत असल्याने काही जण खासगी व्यवस्था करण्याच्या तयारीत आहेत.
बेळगाव पासून कणकुंबी आणि गोव्याच्या सीमेपर्यंतचे रिसॉर्ट कर्नाटक सरकारचे महत्वाचे अधिकारी आणि त्यांच्या पीए नी बुक केले आहेत. जे काय पोचवायचे, उपभोगायचे आणि द्याय घ्यायचे काम असेल ते सर्व याठिकाणी होणार आहेत.
मागील वेळी एक रिसॉर्ट मध्ये अधिवेशन काळातच करोड रुपयांची उलाढाल झाली होती. त्या रिसॉर्ट च्या मॅनेजरला एक अधिकाऱ्याने एक लाख रुपये टीप दिली होती. याची चर्चा असून रिसॉर्ट मध्ये काम करणाऱ्या व्यक्ती पासून सर्व मालकांनाही गुप्तता पाळण्याची अट घालण्यात आली आहे.
नुकतेच एका काँग्रेस नेत्याने एक रिसॉर्टला भेट देऊन पाहणी केली असून तेथे कोणत्या कोणत्या सुविधा आहेत याचा आढावा घेतला आहे. सोमवार पासून दिवसा आणि रात्री अधिवेशन सुरू होणार आहे.