वॅक्सिन डेपो वर होणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मेळाव्यास कर्नाटक पोलिसांनी रविवारी रात्री पर्यंत देखील लिखित परवानगी दिली नसली तरी मैदानाच्या बाजूला असलेल्या वन राईत स्टेज बांधायचे काम सुरू झाले आहे. सोमवारी सकाळी पर्यंत मंच पेंडालचे काम पूर्ण होणार आहे.
मागच्या वर्षीच्या हिवाळी अधिवेशन विरोधी महामेळाव्यात राष्ट्रवादीचे सद्याचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील हे छुप्या मार्गाने कर्नाटक पोलिसांच्या हातावर तुरी देऊन दाखल झाले होते.आज देखील समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या हातात लेखी परवानगी मिळाली नाही.
अशा वेळी महाराष्ट्राची मुलुख मैदान तोफ विधानपरिषद विरोधी नेते धनंजय मुंडे आणि आमदार हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, नुकतेच शिवसेनेत दाखल झालेले आणि आपल्या भाषण शैलीसाठी प्रसिद्ध असलेले धैर्यशील माने कर्नाटक पोलिसांना कसा चकवा देतील हा सीमाभागात सध्या औत्सुक्याचा विषय आहे.
मेळाव्यात सहभागी होणारे राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंढे मेळाव्यात सहभागी होणार असल्याने सीमा भागातील युवकांत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून शासनाने कितीही दडपशाही केली तरी त्यांना ऐकायला हजारोंची गर्दी होणार आहे.