औद्योगिक क्षेत्रातील रस्ते आणि गटारींच्या विकासासाठी लागणाऱ्या खर्चापैकी सरकार ५० टक्के रक्कम देईल. उरलेला खर्च महानगरपालिकेला करावा लागेल. कारण सर्व उद्योगपती मनपाला कर देतात. असे लघुउद्योग मंत्री एस आर श्रीनिवास वासू म्हणाले आहेत
उद्यमबाग येथील औद्योगिक वासहतीस भेट देऊन आल्यानंतर त्यांनी ही माहिती दिली.येथील रस्ते आणि गटारींच्या अवस्था बघून आपल्याला धक्का बसला आहे. बेळगाव हे कर्नाटकातील दुसऱ्या क्रमांकाचे निर्यात केंद्र असताना ही अवस्था दुर्दैवाची आहे. येथे १०००० कारखाने असून ३५००० कामगार योग्य सुविधा मिळत नसतानाही काम करीत आहेत.
बेळगाव जिल्हा लघु उद्योजक संघटनेने मनपा कडे विकासासाठी ५० टक्के निधी मागावा त्यांनी देण्यास नकार दिला तर सांगा मी त्यांच्या मंत्र्यांशी बोलतो आणि दोन महिन्यात निधी मंजूर करून आणतो. असे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी वाहतूक मंत्री तम्मान्ना यांच्याकडे सीबीटी ते व्हिटीयु व आरसीयू साठी एसी बस सुरू करावी अशी मागणी अध्यक्ष रोहन जुवळी यांनी केली. तसेच आता विमानसेवा वाढणार असून सांबरा विमानतळावरून सुद्धा एसी बस सुरू करावी अशी मागणी करण्यात आली.