कर्नाटक विधानसभा अधिवेशन संपले असून आज बंगळूर येथे मंत्रीमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या आठ आमदारांची नावे मुख्यमंत्र्यांकडे देण्यात आली आहेत आता त्यांना कुठली मंत्रीपदे देणार आणि ते खुश होणार का हे आज कळणार आहे.
काँग्रेसच्या संसदीय कार्यकारिणी समितीची बैठक होऊन ही नावे ठरवण्यात आली होती. या बैठकीला काही आमदार नाराज गट अनुपस्थित राहिले तेंव्हा पक्षाने त्यांच्यावर कोणती कारवाई करायची याचा निर्णय वरिष्ठ नेत्यांशी बोलून घेण्यात आल्याचे समजत असून काही जणांवर कारवाई म्हणून त्यांचा या आठ जणांच्या यादीत समावेश करण्यात आलेला नाही.
काँग्रेस मधील नाराजीचा फायदा घेऊन जेडीएस व काँग्रेस युती सरकारला धक्का देण्याचे राजकारण सुरू आहे. मंत्रीमंडळ विस्तार झाल्यास हे राजकारण अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.बेळगाव जिल्ह्यातून सतीश जारकीहोळी यांना मंत्री पद नक्की मानले जात आहे.