आज मुलांमध्ये वाढदिवस साजरा करण्याचा वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या क्रेज निर्माण झाल्या आहेत. वेगळा आनंद मिळवण्यासाठी मैदा अंडी केक असे अनेक पदार्थ वापरून विकृत पद्धतीने वाढदिवस साजरा करण्याच्या नादात नुकसान करत आहेत.
हे प्रकार टाळून अंबिशन युथ अकॅडमी मच्छे आणि स्वयंभू ग्रुप मच्छे यांच्या मार्फत गेली पाच वर्षापासून अनेक उपक्रम राबवत आहेत.
संघटनेच्या कार्यकर्त्याचा वाढदिवस हा एखाद्या अनाथ आश्रम ,वृद्धा आश्रम , किंवा एखाद्या निराधार कुटुंबा सोबत चार ते पाच वर्षापासून साजरा करीत आहेत.
संघटनेचे कार्यकर्ते विकास सुळगेकर (१७ डिसेंबर) आणि सुजित अनगोळकर (२५ डिसेंबर) यांचा वाढदिवस होता.
मन्नूर येथे एक निराधार कुटुंब असून लक्ष्मी ही तिसरीत शिकणारी व गायत्री ही सहावीत शिकणारी ह्या दोन मुलींचा समावेश या कुटुंबात आहे. त्यांचे पालनपोषण त्यांची वयस्क आजी करते.
विकास सुळगेकर यांनी एक नवीन टीव्ही घरी आणला व जुना टीव्ही त्याचा एक चांगला उपयोग व्हावा या उदेशाने तो टिव्ही त्याने या कुटुंबाला देऊन आपला वाढ दिवस साजरा केला.
तसेच सुजीत अनगोळकर याने या कुटुंबाला खाण्याचे पदार्थ देऊन आपला वाढदिवस साजरा केला.
तसेच सुजित यांनी जाधव नगर बेळगांव येथील नंदन मक्कळ धाम येथील ४० मुलांना केक खाऊ घालून आपला वाढदिवसाचा आनंद साजरा केला . व मच्छे येथील मराठी शाळेतील १० गरीब विद्यार्थ्याना शनिवारी दिनांक २८ रोजी सुजित अनगोळकर हे दप्तरे देणार आहेत.
“थोडसं जगणे समाजासाठी” हा अंबिशन यूथ अकॅडमीचा स्लोगन आहे.