महिलांना सॅनिटरी नॅपकिन सहजपणे मिळाव्यात या उद्देशाने बेळगावमध्ये एकूण ८५ सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीन बसवल्या जाणार आहेत. सार्वजनिक ठिकाणी या मशीन असतील स्मार्ट सिटी योजनेतून ही व्यवस्था होणार आहे.
या मशिनसोबत सॅनिटरी नॅपकिन नष्ट करणाराही व्यवस्था असणार आहे. वापरलेले पॅड कुठेही टाकले जाऊ नव्हे म्हणून ही व्यवस्था केली जाणार आहे. पूर्णपणे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने या मशीन काम करणार असून कॉइन घातले की सॅनिटरी पॅड मिळणार आहेत.
एक मशीन मध्ये वेगवेगळ्या आकाराचे ४० नॅपकिन मावणार आहेत. नष्ट करण्याच्या मशीन मध्ये डिजिटल टेम्परेचर कंट्रोलर असणार असून ते दिवसाला ८ ते १० नॅपकिन जाळू शकणार आहेत.