मी सीमा प्रश्नाकडे लक्ष देत नाही आमचा पक्ष राष्ट्रीय पक्ष आहे कर्नाटक आणि महाराष्ट्र ही दोन्ही राज्ये आमच्या साठी सारखीचं आहेत आम्ही फक्त विकासाकडे लक्ष देऊ असं मत महाराष्ट्राचे पशु मत्स्यपालन मंत्री राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेवराव जानकर यांनी मांडल आहे.
बेळगावात शासकीय विश्राम धामात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.रविवार पासून ते बेळगाव दौऱ्यावर होते.
महाराष्ट्रात जरी रासप ने भाजप सोबत युती केली असली तरी कर्नाटकातील 28 जागांवर रासप लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले.पुन्हा नरेंद्र मोदींच देशाचे पंतप्रधान होतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.महाराष्ट्रात दररोज दीड कोटी लिटर दुध उत्पादन होते प्रत्येक लिटरला सरकारकडून पाच रुपये सबसिडी देतो असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकार मध्ये पशु खाते सांभाळत असलेले राज्यमंत्री जानकर यांनी कन्नड मराठी दोन्ही भाषिक सारखेच आहेत सीमा प्रश्नाकडे लक्ष देत नाही असे वक्तव्य करत एक प्रकारे सीमा भागातील मराठी जनतेच्या जखमेवर मीठ चोळले आहे.