मंत्रिपद मिळाल्यानंतर उद्या प्रथमतः सतीश जारकीहोळी बेळगावला येत असून ते पालकमंत्री म्हणून गोगटे सर्कल येथील उड्डाणपूल उदघाटन समारंभात सहभागी होत आहेत.
या कार्यक्रमाच्या पत्रिकेत पालकमंत्री म्हणून रमेश जारकीहोळी यांचे नाव होते पण मंत्रिपद बदलल्याने ते पुन्हा रेल्वे खात्याने दुसरी आमंत्रण पत्रिका काढली असून दुसऱ्या पत्रिकेत सतीश यांचे नाव आहे.
रेल्वे उड्डाणपूल बांधा अशी मागणी करणारा ठराव बेळगाव महानगरपालिकेने केंद्रीय रेल्वे प्रशासनाला पाठवला होता त्यात सतीश जारकीहोळी यांचा सिंहाचा वाटा होता यामुळे आपण हे उदघाटन करणार आहे असे त्यांनी सांगितले आहे. ज्यावेळी मागील सरकार मध्ये अबकारी पालकमंत्री होते त्याच वेळी महा पालिका आणि राज्य सरकारने हा प्रस्ताव पाठवला होता त्या नंतरच या कामाला गती मिळाली होती.मंगळवारी ते पालकमंत्री पदाची शपथ घेऊन पहिल्यांदा बेळगावला येत आहे त्याच दिवशी उड्डाण पूल उदघाटन हा त्यांचा पहिला कार्यक्रम असणार आहे.
सतीश जारकीहोळी हे सकाळी नऊ वाजता सांबरा विमानतळावर आगमन होणार असून त्यानंतर ते शिवाजी उद्यान येथील छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेऊन उदघाटन कार्यक्रमाला जाणार आहेत.
या उड्डाण पुलाच्या उदघाटन कार्यक्रमाला आणण्यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्या सह अनेक मंत्र्यांना आणण्यासाठी स्थानिक खासदारांनी कंबर कसली होती मात्र ते येणार नसल्याने आता पालकमंत्री तरी लाभले असून उदघाटन कार्यक्रमात ते उपस्थित राहतील अशी माहिती मिळाली आहे.