आगामी लोकसभा निवडणुकी संदर्भात सोशल मीडियात जनतेचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न बेळगाव live ने केला होता त्यासाठी ‘ओपिनियन पोल’ सर्व्हे आयोजित केला होता त्यात समितीने कोणत्याही परिस्थितीत लोकसभा निवडणूक लढवणे गरजेचं आहे असे स्पष्ट मत जनतेनं बोलून दाखवलं आहे.
रविवारी रात्री ओपिनियन पोल जाहीर केला होता सोमवार एका दिवसात जवळपास 396 लोकांनी पोल मध्ये आपलं मत मांडलं वयक्तिक भेटी घेऊन 200 हुन अधिक लोकांचे सॅम्पल घेण्यात आले त्यातून हा निष्कर्ष बेळगाव live ने काढला आहे.
अस्तित्व जपण्यासाठी समितीनं लोकसभा लढवणे योग्य आहे का?असा प्रश्न विचारण्यात आला होता त्यात जवळपास 58 %लोकांनी होय निवडणूक लढवली पाहिजे असं म्हटलंय तर 17 लोकांनी नकार दिलाय आणि 25 टक्के मराठी भाषक अस म्हणतात की समितीने सेनेला किंवा राष्ट्रवादीला पाठिंबा द्यावा.
लोकसभा लढवल्याने समिती संघटना बळकट होईल का?असा प्रश्न विचारला होता त्यात 76 %लोकांनी होय,19 टक्के नाही तर 5%लोक मला माहित नाही असे उत्तर दिले आहे.उमेदवार कोण असावा या प्रश्नाला उत्तर देताना 51 %लोक म्हणतात कुणीही चालेल तर 34 %लोकांनी पुरुष उमेदवार तर 15 टक्के लोकांनी महिला उमेदवारांना संधी द्या असे म्हटले आहे. त्यामुळं सोशल मीडिया पोल आणि live च्या सर्व्हेचा विचार केल्यास समिती नेतृत्वाला याचा विचार करणे गरजेचे बनले आहे.